शांत मन ही निर्मळ कृतीची गुरुकिल्ली आहे

09
2014
Dec
बेंगळूरू, भारत

बऱ्याच काळापूर्वी माझ्या मनात असाच एक विचार आला. 
एका राजाचे कोणीही मित्र नसतात आणि एका संताचे कोणीही 
शत्रू नसतात. जर राजाने मित्र बनवण्यास सुरुवात केली तर त्याचा 
तोटा होईल. त्याचप्रमाणे जर एका संताला शत्रू असतील तर त्याचे 
एका नाहीतर दुसऱ्या प्रकारे नुकसानच होईल. जर राजाचे मित्र असतील 
तर अशी शक्यता आहे की त्याच्या मित्रांच्याप्रती पक्षपाती राहून तो 
निर्णय घेईल आणि असा निर्णय लोकांच्या मोठ्या प्रमाणावर भल्याचा 
ठरणार नाही. जर राजा अनेक मित्र बनवू लागला तर त्यामुळे तो 
समदर्शी राहू शकणार नाही आणि मग त्याच्याकडून लोकांना निष्पक्षपाती 
न्याय मिळणार नाही. हो की नाही?
आपण राजाबरोबर अति जवळीक साधु नये आणि एका ज्ञानी संतापासून 
अति दूर जाऊ नये. जे राजाबरोबर अति जवळीक साधतात किंवा एका 
ज्ञानी संताच्या संगतीपासून अति दूर जातात त्यांचे कोणत्या न कोणत्या 
प्रकारे नुकसान हे नक्कीच होणारच.
प्रश्न आणि उत्तरे
 
प्रश्न: या अतिरेकी हल्ल्यांमुळे भूतकाळात अनेक निष्पाप लोक हे मृत्यू 
पावले आणि आजसुद्धा कित्येकजण मृत्यू पावत आहेत. मला हे सर्व 
बघणे सहन होत नाही.
 
श्री श्री: जगात अतिरेकी ही सर्वात मोठी समस्या आहेत. म्हणूनच 
आजसुद्धा भगवद गीता हे समयोचित आहे. 
भगवद गीता असे कधीही म्हणत नाही की जर तुम्हाला एका गालावर 
थप्पड पडली तर दुसरा गाल पुढे करा. नाही!  जर कोणी तुमच्या 
श्रीमुखात थप्पड मारत असेल तर तुम्ही तुमचे धनुष्य आणि बाण 
काढा आणि त्यांना ताबडतोब मारा, पण बदला म्हणून किंवा तिरस्काराने 
म्हणून नाही तर शांतपणाने. समोरच्या माणसाला धडा शिकवण्याच्या 
हेतूने मारा. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' मयि सर्वाणि कर्मणी 
संन्यास्याध्यात्मचेतसा l निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः 
(३.३०) याचा अर्थ आहे : जा आणि दुष्टांबरोबर युद्ध करा पण योगामध्ये 
स्थित राहून 

प्रश्न: जय गुरुदेव, असा कोणता शब्द किंवा असे कोणते वाक्य आहे 
का जे सर्व वयांच्या गटांकरिता म्हटले जाऊ शकते आणि जे सर्व प्रसंगी 
वापरले जाऊ शकते? जर हो तर मग ते काय आहे?
 
श्री श्री: 'जय गुरुदेव!' हे कोणत्याही वेळी, आणि कोणत्याही कारणाने 
सर्वांना म्हणायला चांगले आहे. सुप्रभात, शुभरात्री, स्वागत आहे, 
रामराम, अरे माझ्या देवा! सगळ्याकरिता तुम्ही ‘जय गुरुदेव’ म्हणू 
शकता. आणि जेव्हा गोष्टी घडत नाहीत तेव्हा पण तुम्ही ‘जय गुरुदेव’ 
किंवा ‘ॐ नमः शिवाय’ म्हणू शकता.
प्रश्न: गुरुदेव, माझे डोके अनेक विचारांनी भरले आहे. मला कळत 
नाही काय करावे. कृपा करून काहीतरी सुचवावे.
 
श्री श्री: जर तुमचे डोके अनेक विचारांनी भरले आहे तर जमिनीवर 
झोपा आणि गडबडा लोळा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या शरीराचा 
रक्तप्रवाहात सुधारणा झालेली आहे. जेव्हा रक्तप्रवाहात सुधारणा होते 
तेव्हा मनाला बरे वाटते. म्हणून तर ते शयन प्रदक्षिणा (जमिनीवर 
गोलाकार फिरत देवाची भक्ती करण्याची पद्धत) करतात. ते अनुभवा 
आणि पहा की तुमच्या मनःस्थितीत कसा बदल घडतो ते.
जुन्या दिवसात तो शिबिराचा एक भाग होता. कँनडामध्ये गवताच्या 
टेकड्या आहेत आणि लोक त्यावरून गोलाकार लोळत येतात. दगड 
नाहीत, केवळ गवत, ते एकदम सुरक्षित आहे. जेव्हा तुम्ही जमिनीवर 
गोलाकार लोळता, तेव्हा सर्व भय आणि चिंता निघून जातात.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, या जीवनाचे रहस्य काय आहे? हा एक खेळ 
आहे का?
 
श्री श्री: प्रत्येक लहानसहान गोष्टीत गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्न 
करू नका. असे केले तर तुम्ही आयुष्य जगणार नाही तर केवळ 
संकल्पना आणि कल्पना यांच्यात अडकून राहाल. 

तुम्ही बस्स सोडून द्या आणि प्रत्येक गोष्टीत कारण शोधू नका 
कारण तुमची समज ही खूप मर्यादित आहे.

जसे आपण परिपक्व होत जातो तसतशी आपली समज बदलते, 
मनात परिवर्तन घडते आणि जाणीवेत बदल घडतो. म्हणून, आता 
जाणीवेच्या ज्या पातळीवर आहात आणि जर तुम्ही अति विश्लेषण 
केले तर तुम्ही जाणीवेच्या त्या पातळीवर अडकून पडाल आणि मग 
तुम्ही परिपक्व होऊ शकणार नाही. तुम्ही वयाने मोठे व्हाल पण तुमची 
रुपसरणी ही तशीच जुनाट असेल.
अजिबात विश्लेषण न करणे हे चांगले नाही आणि अति विश्लेषण 
करणे हेसुद्धा चांगले नाही.

प्रश्न: जय गुरुदेव, जनावरांना नैसर्गिक मृत्यू का येत नाही? 
लोकांना त्यांना का मारावे लागते?
 
श्री श्री: होय, ते चुकीचेच आहे. लोकांनी जनावरांना मारणे मला 
अजिबात पसंत नाही. यावर्षी आश्रमात अनेक स्थलांतरित पक्षी 
आले आहेत. तळ्यावर तर माळढोक आणि पाणकोळी हे पहिल्यांदाच 
आले आहेत. त्यांना चांगले पर्यावरण पसंत असावे किंवा मग इतर 
कोठेही पाणी उपलब्ध नसावे. हे फारच चांगले आहे.
आपण पर्यावरण खात्याला सांगितले पाहिजे की इतके पक्षी आले आहेत 
म्हणून तळ्यांमध्ये मासेमारीला परवानगी देऊ नये. जर त्यांनी हवेत 
गोळी चालवली तर हे सगळे पक्षी घाबरून जातील.

(श्रोत्यांपैकी एकाने ऐकू न येण्यासारख्या आवाजात एक प्रश्न 
विचारला.)
 
श्री श्री: तुम्ही लोकांना धीर द्या, त्यांना प्रश्न विचारू आणि 
त्यांच्याकडून सांत्वनाची अपेक्षा ठेवू नका. घरातील माणसांकडून 
सतत आपल्याला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवू नये. 
कधी तुम्ही संतप्त होता, कधी तुम्ही खुश असता, तुम्ही हसता, 
तुम्ही रडता, तुम्ही स्मित करता. तुम्ही आयुष्यभर सर्व भावनांचे 
प्रदर्शन करता, आणि ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. बसून 
त्याबद्दल काळजी करीत राहू नका. बाकीच्या इतर अनेक गोष्टी 
आहेत ज्या तुम्ही करू शकता. घराच्या लोकांमध्ये बदल घडवून 
आणणे हा केवळ काळाचा अपव्यय आहे आणि तसे करण्यात 
काही अर्थ नाही.