विश्वास हे आयुष्याच्या वाहनाचे इंधन आहे


24
2012............................... Banglore Ashram
May

२४ मे २०१२ – बंगलोर आश्रम

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी भौतिक गोष्टींच्या इच्छा, हाव यापासून बऱ्यापैकी मुक्त झालो आहे, पण जेंव्हा तुमच्याकडे येतो तेंव्हा अध्यात्मीक तहान वाढतच जाते. यावर काय उपाय आहे?
श्री श्री: ठीक आहे. जेंव्हा कोणी व्यावहारिक जगापासून दूर जाऊन ‘स्व’ कडे जातो तेंव्हा असेच होते. आयुष्यात स्वारस्य असावे, ते निरस नसावे. हा मार्ग निरस नाही. आयुष्यात काही रस असावे, नाही का? अन्यथा ते “शुष्क वैराग्य” होईल. आपल्या जवळ जेंव्हा कोणी आपल्या जवळचा असतो, प्रेमाचा माणूस असतो तेंव्हा आयुष्य मजेदार होते. आयुष्यात जर कोणी असा नसेल ज्याच्यावर आपण खूप प्रेम करू तर मग आयुष्यात मजा नाही, त्यात काही रस नाही. त्यामुळे प्रेमाचा अनुभव होणार नाही. त्यामुळेच हे स्वारस्य, रस गरजेचा आहे. हळूहळू तुमच्या लक्षात येईल, जे दैवत्व माझ्यात आहे, ते सगळ्यांत आहे, आणि सगळीकडे आहे.

प्रश्न: गुरुजी, आपण ‘साक्षी भावात’ कसे राहावे?
श्री श्री: तुम्ही साक्षी भावात असण्यासाठी काहीच करायची गरज नाही; तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल. तुम्ही जितके शांत व्हाल, विश्राम कराल तितका जास्त साक्षात्कार होईल, तुम्हाला त्यासाठी काहीही करायची गरज नाही. आजकाल काय होते, सगळे साधक विचारत असतात ‘मी काय करू, मी काय करू’ आणि गुरु त्यांना सांगत असतात ‘हे करा, ते करा, ते करा’ त्याने दोघेही निराश होतात. मी सांगतो, काहीही करायची गरज नाही, आराम करा! विश्राम ही कर्तृत्व, शांतता आणि परिपूर्णत्व यांची जननी आहे. सगळ्याचे मूळ विश्राम हे आहे. विश्रामात ‘राम’ आहे, तो मिळवण्यासाठी फार प्रयत्न करायची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खावे आणि झोपावे!
मित् आहार, मित् व्यवहार, मित् भाषी, हित भाषी, हे सगळे अत्यावश्यक आहे.      

प्रश्न: गुरुजी, आयुष्य सोपे आहे की अवघड? बुद्धिझम मध्ये असे म्हणतात ‘आयुष्य अवघड आहे हे पहिले सत्य आहे’ तुम्ही म्हणता की आयुष्य मौज आहे. काय सत्य आहे? मला असे सांगू नका की दोन्ही सत्य आहे.
श्री श्री: का? मी तेच म्हणीन. दोन्ही बरोबर आहे. जेंव्हा एखाद्या दु:खी माणसाला तुम्ही सांगाल की आयुष्य आनंद आहे, त्याला ते समजणार नाही. त्याला आयुष्य हे फक्त दुःख आहे असेच वाटेल. परंतु जसजसा तो ज्ञानीं होईल, त्याला जाणीव होईल ‘दु:ख कुठे आहे?’ जसा तो ज्ञान मार्गावर पुढे वाटचाल करेल तसा तसे दु:ख नाहीसे होईल. तुमच्या आयुष्यातून दु:ख नाहीसे करणे हाच योगा आणि ध्यानाचा फायदा आहे. तुम्ही विनाकारण काळजी करत होतात, आयुष्य हे आनंद आहे हे तुमच्या लक्षात येते.
जागे व्हा आणि भूतकाळात वळून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही विनाकारण काळजी करत होतात. तुमच्या पैकी किती जणांना तसे वाटते?
परीक्षेचे निकाल काळ जाहीर झाले. काही दिवसांपूर्वी तुम्ही काळजीत होतात, मी पास होईन का? आता तुम्हाला असे नाही वाटत तुम्ही विनाकारण काळजी करून वेळ वाया घालवलात? सगळे ठीक झाले. उदाहरणदाखल आश्रम शाळेच्या विद्यार्थी घ्या; सगळे विशेष श्रेणीत पास झाले. काळजी केल्याने वेळ वाया जातो, आणि मन विचलित होते. म्हणूनच असे म्हणले जाते कोणताही उपक्रम झाल्यानंतर, असे लक्षात येते की काळजी करणे व्यर्थ होते. म्हणूनच आनंद हे वास्तव आहे, आनंद हा कायम आपल्या बरोबरच होता, तो आपला स्वभाव आहे. चिंता ह्या एखाद्या ढगा प्रमाणे येतात आणि जातात. जे कधीही बदलत नाही तेच सत्य होय, ज्याप्रमाणे आकाश हे सत्य आहे आणि ढग येतात आणि जातात.  

प्रश्न: मला आर्थिक जुळवाजुळव करताना खूप कष्ट पडत आहेत. गेली १५ वर्ष मी संघर्ष करत आहे. ज्योतिष्यांनी सांगितले आहे की काही पूजा केल्याने माझे भाग्य बदलेल. कृपया सल्ला द्याल का?
श्री श्री: ओह, तुमचे खर्च तुमच्या कमाई पेक्षा जास्त आहेत. तुमची भरभराट होवो असा संकल्प करा, तेव्हडे पुरेसे आहे. पूजा करणे चांगले आहे, काही पूजा चांगल्या आहेत, पण खूप पूजा करणे जरूर नाही. तुम्ही ध्यान करा, सत्संगला जा. रुद्राभिषेक आणि हवन करा. जेंव्हा तुम्ही हवन करता, तेंव्हा वातावरण आणि मन शुद्ध होते. पण कधी कधी ते खूप धार्मिक विधी आणि पूजा करायला सांगतात त्याची फार गरज नाही.

प्रश्न: माझे एका परजातीय व्यक्तीवर प्रेम आहे; माझे पालक सनातनी विचारांचे आहेत. त्यांना हे समजूच शकत नाही. मी माझ्या परीने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने काही फरक पडला नाही. मी काय करू? माझा ‘धर्म’ काय आहे? मी माझ्या साठी जगावे की त्यांच्यासाठी.

श्री श्री: थोडे कौशल्याने घ्या. परिणामांचे मुल्यांकन करा. ते जर दुराग्रही असतील तर त्यांना या दैन्यातून नेण्यात अर्थ नाही. तुम्ही सुद्धा आनंदी राहणार नाही. तुम्ही दोघेही दु:खी राहाल. तुम्ही तुमचे कौशल्य लावून त्यांना समजावा, काही मध्यम मार्ग काढा, त्यानेहि काही झाले नाही तर परिणामांचा विचार करून निर्णय घ्या. 

प्रश्न: पण धर्मा काय सांगतो? एक मुलगी म्हणून मी त्यांना दुखवू शकत नाही, पण मला माझे आयुष्य सुद्धा आहे.
श्री श्री: तुमचे बरोबर आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही तसे करा. पण आता तुम्ही जर तुमच्या पालकांची एकुलती एक मुलगी असाल तर तुम्हाला त्यांची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला जरी भावंडे असतील तरीही अडचण आहे. तुमचे कौशल्य पणाला लावून त्यांना समजवा, नाहीतर दुसऱ्यांच्या आनंदासाठी कधीकधी त्याग करावा लागतो.

प्रश्न: व्यावसायिक आयुष्यात गर्विष्ट लोकांना कसे हाताळावे?
श्री श्री: त्यांच्या गर्वाला प्रोत्साहन द्या. हे जर गर्विष्ठ असतील तर त्यांना २ प्रकारे हाताळले जाऊ शकते. एक म्हणजे त्यांचा ‘अहं’ प्रोत्साहित करा. त्यांना सांगा ‘तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही इतके कार्यक्षम कसे असता? मला तुमच्या कडून काही शिकायला पाहिजे’ त्यामुळे ते तुमच्या बाबतीत आनंदी होतील. समजले?
त्यांची थोडी प्रशंसा केल्याने तुमचे काही बिघडत नाही. मुर्ख लोकांची थोडी प्रशंसा करून काम करून घेतले पाहिजे. तुम्ही प्रशंसा करा किंवा करू नका चांगले लोक नेहेमीच काम करतात. गर्विष्ट आणि मुर्खा लोक प्रशंसेच्या मागे लागतात, त्यामुळे तुम्ही थोडी प्रशंसा करून कामे करून घ्या.
त्यांच्या गर्वामुळे त्यांना भोगावे लागेल, त्याची चिंता तुम्ही कशाला करता? त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगले आहे कारण त्यामुळे ते भानावर येतील. संकटाचे आपले स्थान आहे. एखाद्याचा ‘अहं’ मोडून त्याला ज्ञान मार्गावर आणण्याचा काळ आता गेला. हल्ली एखाद्याचा ‘अहं’ मोडणे खूप कठीण आहे. ‘अहं’ नेहेमीच उफाळून वर येतो. त्यामुळे तुम्ही त्यांची प्रशंसा करणे चांगले, ते सुद्धा आपोआप त्यातून शिकतील.

प्रश्न: मुलांना वाढवताना चांगली मूल्ये कशी शिकवावीत?
श्री श्री: स्वतः ती मूल्ये जगून !!

प्रश्न: मला आश्रमात राहायचे आहे. मला वाटते की मी माझ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत आणि आता मला इथे राहून साधना, सत्संग, सेवा करायची आहे. माझे नातेवाईक आणि सासरचे लोक माझ्या निर्णयाला विरोध करत आहेत.
श्री श्री: तुम्हाला माहित आहे, संपूर्ण जग माझा आश्रम आहे. तुम्ही कुठेही रहा तो आश्रमच आहे. शिवाय मी एका ठिकाणी राहत नाही, मी प्रवास करत असतो. मी इथे २ महिन्यांनंतर आलो आहे, आणि मी इथे २ आठवडे आहे. मी इथे येत जात असतो. तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि सासरच्यांना प्रेमाने जिंका. तुम्ही साधना आणि सेवा करून तुमच्या घराला आश्रम करा. इथे वर्षातून एकदा किंवा दोनदा या. तुम्ही सगळे सोडून आश्रमात जातो असे त्यांना सांगितले तर ते काळजीत पडतील. त्यांना वाटेल ‘ही आपली सून घर सोडून जात आहे’, असे करू नका.     

प्रश्न: मी जेंव्हा जेंव्हा आश्रमात येतो तेंव्हा घरच्यांना सांगत नाही. मी कॉलेजमध्ये सुद्धा खोटी कारणे सांगुन इथे येतो. मी हे कौशल्याने हाताळत आहे; पण कधी कधी मला खोटे बोलायचा कंटाळा येतो.

श्री श्री: नाही, तुम्ही खोटे सांगता काम नये, तुम्हाला इथे सारखे सारखे येण्याची गरज नाही. तुम्ही कुठेही असाल तरी रोजचे ध्यान करा. तुम्हाला मी तसाही रोज दिसतो. आत्ता सुद्धा हा सत्संग इंटरनेट वर दाखवला जात आहे आणि जगातील लाखो लोक मला पाहत आहेत. वर्षातून एक दोन वेळेला येणे ठीक आहे पण तुम्ही जर रोज यायला लागलात तर घरातून विरोध स्वाभाविक आहे. मी त्यांच्या जागी असतो तर मी सुद्धा याला विरोध केला असता.
असे करू नका. तुमच्या अभ्यासावर, व्यवसायावर लक्ष द्या, आणि एक आदर्श व्यक्ती बना. नुसते इथे आश्रमात येऊन माझा चेहेरा बघण्यापेक्षा शिकवण अनुसरा.

प्रश्न: माझी आई सांगते, तू जर खोटे बोलून, आम्हाला दुखावून आर्ट ऑफ लिविंगच्या कार्येक्रमाना गेलात तर तुम्हाला त्याचे अपेक्षित फळ, पुण्य मिळणार नाही. हे बरोबर आहे का?

श्री श्री: होय, एका अर्थाने बरोबर आहे.

प्रश्न: गुरुजी, पण ती समजून घेत नाही. ती क्रिया सुद्धा करत नाही. मी बळजबरी केली तरी ती क्रिया करत नाही. कृपया माझ्या आई, वडिलांची काळजी घ्या.

श्री श्री: आता तुम्ही तुमचे काम मला दिले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेणे अपेक्षित नाही का? ठीक आहे, मी माझे काम करत आहे, हेच तर होते आहे. लोक मला सांगतात ‘गुरुजी, हे करा, ते करा’ मला सगळीकडून आज्ञा मिळत असतात!!

प्रश्न: मी जेंव्हा दुसऱ्या लोकांच्या चुकांचा विचार करतो, मी उन्मत्त होतो; आणि जेंव्हा माझ्या चुका पाहतो तेंव्हा माझा अहं दुखावतो. मी काय करू?

श्री श्री: तुमच्या कमजोरी कडे पहा आणि जाणून घ्या की कोणीतरी त्या दूर करायला आहे. विश्वास असू द्या की कोणीतरी त्या दूर करायला आहे. फक्त या विश्वासामुळे तुम्ही पुढे जाल. ‘या माझ्यातील उणीवा मी तुम्हाला समर्पित करत आहे’ या विश्वासाने तुमच्या उणीवा समर्पित करा. तुम्हाला समर्पित करणे अवघड जात असेल तर हे जाणा की कोणीतरी यातून बाहेर पडायला मदत करेल. जसे शाळेतील मुलाला माहित असते की त्याला मोजणी येत नाही पण त्याला विश्वास असतो की शिक्षक त्याला शिकवतील. तो जेंव्हा पुस्तकाचे पहिले पण उघडतो आणि त्याला काय लिहीले आहे ते उमगत नाही, तरीही त्याला विश्वास असतो की त्याला ते समजेल कारण त्यासाठी शिक्षक आहेत. 
विश्वास असल्याशिवाय आयुष्याचा गाडा पुढे जात नाही. विश्वास हे आयुष्याच्या गाडीचे इंधन आहे. विश्वास हे इंधन सुद्धा महाग होत चालले आहे !! तुम्ही हे इंधन महाग होऊन दिले नाहीत तर आयुष्याची गाडी पुढे जाईल आणि इच्छित स्थळी पोहोचेल.

प्रश्न: जर सर्व काही देवाने निर्माण केले असेल तर देवाला कोणी निर्माण केले?
श्री श्री: तुम्हाला कोणी सांगितले की सर्व देवाने निर्माण केले? तुम्ही या कोणी निर्माण केले, कोणी विनाश केला यात का अडकून बसता. जे आहे ते आहे. देवाला संबोधण्यासाठी “स्वयंभू” हा शब्द वापरतात, त्याचा अर्थ ज्याने स्वतःलाच निर्माण केले. तो कायमच अस्तित्वात होता. आपण म्हणतो सूर्य उगवला. आपण पाहतो सूर्य उगवतो, मावळतो; पण सूर्य कधीच उगवत नाही किंवा मावळत नाही. वास्तविक सूर्य तिथेच आहे, फक्त तो आपल्याला दिसत नाही याचा अर्थ तो नाही असा नाही. त्यामुळे जे अस्तित्वात आहे आणि कधीहि जन्माला येत नाही त्याला देव म्हणतात.

प्रश्न: माझी बायको आणि आई यांच्यात कुरबुरी चालू असतात, त्यांचे आपापल्यापरीने बरोबर असते. मला कळत नाही काय करावे?
श्री श्री: अशा वेळी शांत आणि तटस्थ राहणे योग्य. कोणाच्याही बाजूने बोलू नका. तुमच्या आईला सांगा ‘सुना या अश्याच असणार’ तसेच तुमच्या पत्नीला सांगा ‘माझी आई तुझ्या आई सारखीच आहे, ते तसेच असतात, तिचे फारसे मनावर घेऊ नकोस’ ज्ञानामुळेच अशा समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकाल.    

प्रश्न: मंदिरातील कलशाचे काय महत्व आहे?
श्री श्री: कलश वास्तू आणि वास्तुशास्त्र या दृष्टीने महत्वाचा आहे. तो विद्युत लहरी आणि कंपने नियंत्रित करतो. दुसरे म्हणजे तो दैवी शक्तीचे प्रतिक आहे. तो वैश्विक उर्जा पृथ्वीवर आणण्याचे माध्यम आहे.  

प्रश्न: मी गेली २५ वर्ष नोकरी करत आहे, पण मला अजूनही स्वाभिमान आणि अहंभाव यातील फरक समजत नाही.
श्री श्री: तुमचा स्वाभिमान कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. पण अहंभाव इतरांवर अवलंबून आहे. जिथे अहंभाव असेल तिथे तुम्हाला वेदना होतील, आणि त्याने दु:ख होईल. पण स्वाभिमान तुम्हाला शांतता मिळवून देईल, समजले?
तुमचा अहंभाव तुम्हाला दुखावेल, पण स्वाभिमान दुखवू शकत नाही. समाजात असे बरेच मूढ लोक आहेत जे दुसऱ्याला शिवीगाळ करत असतात. तुम्ही कितीही चांगले करा, ते कायमच नकारात्मक बोलत असतात. आपण त्यामुळे विचलित होऊ नये. 

प्रश्न: मी तणावामुळे माझे काम करू शकत नाही
श्री श्री: तुम्ही हसत हसत तुमचे काम करत रहा, लोकांची पर्वा करू नका. कोणीतरी काहीतरी म्हणाले म्हणून तुमचे काम सोडू नका. तुम्ही राजा प्रमाणे चाला, जर कोणी तुम्हाला चुकीचे काम करायला सांगितले तर नम्रपणे त्यांना सांगा की तुम्ही असे काम करणार नाही. ‘काही चुकीचे काम करून मला तुरुंगात जायचे नाही’ असे सांगून तुमचे चांगले काम करत रहा. ज्या कामाने तुम्हाला भविष्यात त्रास होणार आहे असे काम न करण्याचा निश्चय करा. जेंव्हा आपण असे करू, स्वतःचा आदर करू त्यालाच स्वाभिमान असे म्हणतात.

प्रश्न: जगामध्ये करोडो हिंदू लोक आहेत, पण हिंदू देव देवतांचा अपमान केला जातो. देव आपल्यावर रागावला आहे का?
श्री श्री: नाही, देव रागावला नाही, काही लोक असे करत आहेत, पण तुम्ही त्याची काळजी करू नका.
हिंदू धर्माचा कोणीही अपमान करू शकत नाही. जे कोणी हे करत आहेत तो त्यांचा नादानपणा आहे. कोणी माध्यमातून किंवा चित्रपटातून हिंदू धर्माबद्दल वाईट दाखवत असतील तरी आपण दुखीः होण्याचे कारण नाही. हिंदू धर्म हजारो वर्षेपासून अस्तित्वात आहे, आणि तसाच चालू राहील. त्यामुळे हिंदू धर्माबद्दल कोणी काही म्हणाले तरी तो त्यांचा नादान आणि मुर्खपणा सगजून सोडून द्यावे. तुम्ही रागाने आणि सूड भावनेने बस जाळून, दगडफेक करून किंवा कोणाला इजा पोहोचवून समाजात हिंदू धर्माचा आदर वाढणार नाही. आपल्या आचरणातून, मृदुलता, सेवा आणि इतरांना शिक्षित करून तो वाढेल.

चेतना सर्वव्यापी आहे


  3
2012............................... Kive, Ukrain
May

कीव, युक्रेन

आपण आपल्याला मिळालेला आनंद, परमानंद पसरवायचा आहे. आयुष्यात इतके काही आहे हे जास्तीत जास्त लोकांना समजले पाहिजे. आपल्याला आयुष्याबद्दल खूप कमी माहित आहे, आणि खूप काही समजावून घ्यायचे आहे. हे ज्ञान खूप मौलिक आहे, नाही का?
आपण असा विचार करतो की मन (चेतना) ही शरीरात आहे, पण तसे नाही, शरीर चेतनेत आहे. शरीर हे दिव्याच्या वाती सारखे आहे तर मन त्या भोवतीची ज्योत. तुम्ही जितके निवांत असाल तितके मन प्रसारीत होते, मोठे होते. तुम्ही जितके समाधानी आणि परिपूर्ण असाल तितके मोठे आणि तेजस्वी व्हाल.

प्रश्न: गुरुजी, किव मध्ये १०० पेक्षा जास्त संतांची शरीरे आहेत. तुम्ही त्या बद्दल सांगाल काय?
श्री श्री: संत हे शरीर नव्हेत, तर ते चेतना आहेत. शरीर हे भाज्या, धान्य आणि अन्नापासून बनले आहे. हे अनंत काळापासून इथे आहे, शरीराचा प्रत्येक अणु या धरतीचा भाग आहे. धरतीपासून तयार होते आणि धरतीला जाऊन मिळते. पण चेतना खूप महत्वाची आहे, ती सर्वव्यापी आहे.

प्रश्न: ही शरीरे क्षय होत नाहीत. ती आहेत तशीच राहतात.
श्री श्री: होय, हीच भक्ती आहे. जितकी जास्त भक्ती आणि प्रेम असेल तितक्या तुमच्या शरीरातील पेशी तजेला तयार करतात. जिथे भक्ती असेल तिथे चमत्कार घडतात. चेतना ही फक्त शरीराशी निगडीत आहे असे समजू नका. चेतना सर्वव्यापी आहे. तुम्ही कुठेही असाल, जेंव्हा तुम्ही विचार करता तेंव्हा तुम्ही चेतनेशी जोडले जाता. आपली शरीरे टेलीव्हिजनच्या डब्यांसारखी आहेत. खरी उर्जा ही त्या चॅनेलच्या लहरीमध्ये आहे. जेंव्हा तुम्ही टीवी चालू करता, तेंव्हा जे चॅनेल दिसते ते फक्त टीव्ही वर नसते तर पूर्ण खोलीभर असते.

प्रश्न: मनातल्या नकारात्मक भावनांना कसे घालवावे?
श्री श्री: चांगली संगत. ज्याच्या बरोबर बसून नकारात्मक बोलण्यानंतर जेंव्हा तुम्ही सकारात्मक होता तोच खरा मित्र. ज्याच्या बरोबर बसून थोडे नकारात्मक बोलल्यानंतर जेंव्हा तुमची नकारात्मकता अधिक मोठी होते तो वाईट मित्र. त्यामुळे पहिले म्हणजे चांगली संगत. दुसरे, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान. तिसरे म्हणजे शरीर शुद्धी.
जेंव्हा तुमचे पोट साफ होत नाही, यकृत कठीण असते तेंव्हा त्याचा डोक्यावर सुद्धा परिणाम होतो. कधीकधी शरीराची शुद्धी सुद्धा जरुरी असते. जैवविष काढून टाका, किंवा पथ्य आहार घ्या. आयुर्वेद, पंचकर्म या सगळ्याचा उपयोग होईल.

प्रश्न: रोग आपल्या आयुष्यात का येतात? त्यांचे काय प्रयोजन आहे?
श्री श्री: कारण आपण निसर्गाचे नियम मोडत आहोत. आपण जे खायला नको ते खातो आहोत किंवा खूप खात आहोत. आपण पर्यावरणाची योग्य काळजी घेत नाही. सगळीकडे (टेलीकम्युनिकेशन) चे मनोरे आहेत, त्याने उत्सर्ग वाढतो आहे. या सगळ्याचा आपल्यावर परिणाम होतो. त्याचबरोबर तेंव्हा मन तणावाखाली असते तेंव्हा प्रतिकारशक्ती कमी होते.   
  
प्रश्न: आपण कशासाठी जगतो?
श्री श्री: प्रथम तुम्ही कशासाठी जगात नाही याची यादी करा. आयुष्याचा उद्देश स्वतः दु:खीकष्टी राहून दुसऱ्याला सुद्धा दु:खी करणे हा नाही, बरोबर? मग काय उद्देश असेल? आपण दुसऱ्याच्या आयुष्यात अधिक आनंद कसा आणू शकू? आपण आपल्या अंतरंगाशी, आत्म्याशी कसे जोडले जाऊ? आपण कोण आहोत याचा शोध घेणे? यालाच अध्यात्म म्हणतात आणि तुम्ही योग्य जागी आलेले आहात.   

प्रश्न: दैवी मूल बनण्यासाठी मनाची आणि हृदयची कशी तयारी करावी?
श्री श्री: मुलाप्रमाणे, बालकासारखे बना. कुठलाही संकोच नाही, पूर्वग्रह नाही. साधे आणि नैसर्गिक रहा.

प्रश्न: मला वाटते माझी नियती, संगीताद्वारे लोकांना आनंद देणे, गायनाद्वारे लोकांची उन्नती करणे ही आहे.
श्री श्री: आयुष्य संगीताशिवाय अपूर्ण आहे, पण संगीत म्हणजे सर्व नाही. संगीत हा एक भाग झाला. तुम्हाला आयुष्यात अजून गोष्टी करायच्या आहेत, त्या करा. या सगळ्यात पहिली म्हणजे ज्ञान. ज्ञान, अध्यात्मीक ज्ञान खूप महत्वाचे आहे.        

प्रश्न: माझा मुलगा जुगाराच्या व्यसनाधीन आहे, त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे.
श्री श्री: तुम्हाला एक मुलगा आहे, मला अशी लाखो मुले आहेत, जी वाईट गोष्टींच्या आहारी गेली आहेत. जागे व्हा आणि तुमच्या मुलासारख्या इतरांना कशी मदत करता येईल ते पहा. तुम्हाला दुसऱ्यासाठी काही करता यावे यासाठी ही वेदना आहे; समाजासाठी, इतर मुलांसाठी.    

आसक्ती हे चेतनेच्या परिपक्वतेचे लक्षण आहे


22
2012............................... Banglore, Karnataka
May

बंगलोर आश्रम
प्रश्न : गुरुजी, योगसार उपनिषदमध्ये आपण म्हटले आहे की, दिव्यत्व हे व्यक्तिनिरपेक्ष आहे. गुरु हा सापेक्ष आणि दिव्य दोन्ही आहे. आम्हाला याविषयी अधिक सांगाल का? देव हा व्यक्तिनिरपेक्ष कसा?
श्री श्री रविशंकर : होय, तो दोन्ही आहे. जसे तुम्हाला आकार आहे तरी तुम्ही निराकार देखील आहात. तुमच्या शरीराला आकार आहे, पण तुमच्या मनाला आकार आहे का?... नाही! तशी ही दिसून येणारी सृष्टी ही दैवाची प्रचीती आहे आणि हे दिसून येत नाही, पण ज्याची जाणीव होते असे हे वातावरण निराकार आहे.

प्रश्न : गुरुजी, आपण म्हणालात, उपनिषदात सांगितले आहे की, जेव्हा आत्मा स्वतःला प्रकट करतो तेव्हा  ज्ञानाचा साक्षात्कार होतो. मग यामध्ये आसक्तीचा संबंध येतो कुठे? माझ्यात असलेले काहीतरी स्वतःबद्दलचे संपूर्ण ज्ञान करून घेण्याची इच्छा बाळगते तरी तेच स्वतःला प्रकट करीत नाही; हे असे कसे?
श्री श्री रविशंकर : बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे, जेव्हा फळ पिकते तेव्हा त्याचा रंगदेखील बदलतो. सफरचंद जेव्हा पिकते तेव्हा त्याचा रंग बदलतो. पपई पिकल्यावर पिवळी होते. तसेच आसक्ती हे चेतनेच्या परिपक्वतेचे लक्षण आहे.
प्रश्न : गुरुजी, आत्मा जर एकच आहे तर मग प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे कसे होते आणि तो एका शरीरातून दुसर्‍या शरीरात कसा नेला जातो?
श्री श्री रविशंकर : आत्म्याचे दोन स्तर असतात - सर्वात्मा आणि जीवात्मा. जशी फुग्यातदेखील हवा असते आणि बाहेरदेखील; पण फुग्यातली हवा बंदिस्त असते. तसा जीव असतो. जीवाचा प्रभाव दिसून येतो; पण फुग्यातली हवा आणि बाहेरची हवा ही सारखीच असते.
प्रश्न : गुरुजी, प्रत्येक गोष्टीचे काही अनिष्ट परिणाम असतात. मग प्रबोधनाचे दुष्परिणाम काय असतात?
श्री श्री रविशंकर : प्रबोधनाचा कोणताही अनिष्ट परिणाम नसतो. त्याचा थेट परिणाम होत असतो.
प्रश्न : गुरुजी, आपण अलीकडेच एका सत्संगमध्ये अंधारमय ऊर्जेचा (dark energy) उल्लेख केला होता. कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. गुगलवरील माहिती वाचून ते समजणे खूप कठीण आहे.
श्री श्री रविशंकर : अंधारमय उर्जेविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. हे ब्रह्मांड अंधारमय उर्जेने व्यापले आहे. सूर्य गोलाकार आहे असे ते म्हणतात, त्याचे कारण सूर्याभोवती अंधारमय ऊर्जा आहे; जी सूर्याला गोलाकार ठेवते. म्हणजे सर्व ग्रह, तारे यांचे अस्तित्व अंधारमय उर्जेतच आहे.
जसे आकाश अंधारमय असते आणि त्या आकाशातले तारे हे प्रकाशाचे बिंदू असतात, त्यामुळे आपल्याला वाटते यातील फक्त तारे हेच वास्तव आहेत. पण शास्त्रज्ञ म्हणतात तसे नाही. ताऱ्यांमधील पोकळी एखाद्या दाट महासागराप्रमाणे ऊर्जेने पूर्णपणे भरलेली आहे. ती आहे अंधारमय उर्जा. आपल्या प्राचीन काळातील लोकांना हे माहित होते. ते याला शिव-तत्व म्हणत. सर्वम् शिवामयम् जगत्. संपूर्ण ब्रह्मांड शिवतत्वाने धरून ठेवले आहे.
प्रश्न : अष्टवक्र गीतेमध्ये आपण महात्मा गांधीना एवढा हिंसक मृत्यू का आला याबद्दल सांगितले आहे. जीजसला क्रूसवर मृत्यु का आला याबद्दल आम्हाला सांगाल का?
श्री श्री रविशंकर : आपण याबद्दल, का झाले, काय आणि केव्हा झाले असे खोलात जावे असे मला वाटत नाही. ब्रह्मांडात घडणाऱ्या सर्व गोष्टींना फक्त एकच कारण आहे परम् कारण कारणाय - शिवतत्व! ईश्वरी इच्छा! आपण हे सर्व त्यावर सोडून देऊ.

प्रश्न : पाप किंवा कर्म यास कोण जबाबदार आहे?  आत्मा की शरीर? आणि जर आत्मा यास जबाबदार असेल तर त्याचे भोग शरीराला का भोगावे लागतात?
श्री श्री रविशंकर : हे बघा, अशा पारिभाषिकतेमध्ये आणि गोंधळात पडू नका. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल तर स्वतः संशोधन करा. आपण कोण आहोत? आपणास कर्म आहे की नाही? जर कर्म असेल तर ते कोठे आहे, या सर्वाचा तुम्ही स्वत: विचार करा.
याचे उत्तर जर मी तुम्हाला दिले तर त्याने तुमचे समाधान होणार नाही; कारण ते तुमच्या अनुभवांच्या पातळीवरचे नसेल. म्हणून मी सांगितलेले तुम्ही आता ऐकाल आणि काही दिवसांनी तुम्ही काही नवीन प्रश्न घेऊन याल. आणि मग पुन्हा पुन्हा हे चक्र चालूच राहील.
सर्वात उत्तम म्हणजे, शांत व्हा, गहन ध्यानधारणा करा आणि यातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआप अनुभवता येतील.
प्रश्न : गुरुजी, पुष्कळ प्रयत्न करूनदेखील मी अयशस्वी का होतो? अशा वेळेस आपण काय केले पाहिजे?
श्री श्री रविशंकर : जर तुमचे ध्येय तुम्हाला खरोखरच साध्य करायचे असेल तर त्या ध्येयाला धरून रहा. पण जर भरपूर प्रयत्न करूनही ते निरर्थक जात आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल, तर दुसरे काही सोपे असे काम करा.
भारताचे एक पंतप्रधान होते, फार थोड्या महिन्यांसाठीच ते पंतप्रधान होते. या सद्गृहस्थांनी मला एकदा त्यांच्या दिल्लीबाहेरच्या फार्म हाउसवर बोलावले. मी ते मान्य केले आणि मी तिकडे गेलो. मी तिथे असताना मला ते म्हणाले, गुरुजी, गेल्या ४० वर्षांत मी सर्व काही केले. ही खुर्ची, हे पंतप्रधानपद मिळवण्यासाठी मी चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे राजकारण केले. आता मी पंतप्रधान आहे. आणि  आता मला वाटते, या पदासाठी मी संपूर्ण आयुष्यभर झटलो पण हे निरर्थक आहे. पूर्वी मला आनंदाने झोप लागत असे, पण आता आजूबाजूला ५० रक्षक असतात. मी माझ्या स्वत:च्या घराबाहेर बसूदेखील शकत नाही. मी संपूर्ण आयुष्यभर व्यर्थ संघर्ष केला.
मी म्हणालो, हे समजण्यासाठी तुम्हाला फारच वर्षे लागली. पण ठीक आहे, किमान तुम्हाला ते समजले तरी. बऱ्याच लोकांना हे समजतदेखील नाही.
उत्तर आफ्रिकेमधील हुकुमाशहांचे काय चालले आहे? केवळ सत्ता टिकवण्यासाठी ते हजारो लोकांना मारत आहेत. हा  मूर्खपणा आहे. या सद्गृहस्थांना हे निरर्थक आहे याची किमान जाणीव तरी होती. मी त्यांना म्हटले, त्यादृष्टीने तुम्ही भाग्यवानच आहात.
म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट खरोखरच साध्य करायची असेल तर त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करा, पण जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्याच गोष्टीवर शक्ती खर्च करणे जास्त योग्य आहे असे वाटले तर त्या मार्गाने जा.
एकदा एक तरुण माझ्याकडे आला. तो म्हणाला की, तो सी.ए.च्या परीक्षेत सात वेळा नापास झाला आहे आणि आता त्याने पुन्हा त्या परीक्षेला बसावे असे त्याच्या पालकांची इच्छा आहे.
मी म्हणालो, तुला असं कशासाठी करायचे आहे? तू सात वेळा नापास झाला आहेस, आता तुला पास होण्याची खात्री वाटते का?
तो म्हणाला, नाही, पास होण्याची मला अजिबात खात्री नाही.
जर तुला पास होण्याची खात्रीच नाही तर वेळ वाया का घालवत आहेस? काहीतरी व्यवसाय कर. एखादी नोकरी कर. शहाणपणाच्या अनेक गोष्टी करण्याजोग्या आहेत.

प्रश्न : गुरुजी, मी जेव्हा इतरांबरोबर माझी स्वत:ची तुलना करतो तेव्हा मला त्यांचा द्वेष आणि मत्सर वाटतो. मला माझी ही सवय सोडायची आहे. त्यासाठी मी काय केले पाहिजे?
श्री श्री रविशंकर : तुला ही सवय सोडायची इच्छा आहे म्हणजे अर्धा मार्ग तर पार झालाच आहे. प्रयत्न चालूच ठेव. साधना आणि सत्संग यासाठी जास्त वेळ दे म्हणजे तू यातून आपोआप बाहेर पडशील.

प्रश्न : गुरुजी, देवाच्या नावाचा जप करण्याला नक्की महत्व काय आहे? महाराष्ट्रात असे म्हटले जाते की विठ्ठलाच्या नावाचा जप जर मनापासून केला तर योगसाधना केल्याने होणारे फायदे मिळतात.
श्री श्री रविशंकर : आपण हे दररोज सकाळी सत्संगमध्ये करतच असतो. आपण दिव्यत्वाचा जप करतो.
होय, जप करत राहिल्यामुळे तुम्ही अजाप अवस्थेत (मनाची अशी अवस्था जिथे मंत्राचा जप आपोआप होत राहतो) जाता. तुम्ही शांत होता. तुम्ही जप करण्याच्याही पलीकडे जाता. समाधी अवस्थेच्यादेखील पलीकडे जाता. याला भाव समाधी म्हणतात. भाव समाधी ही अशी गोष्ट आहे ज्याचा अभ्यास केला पाहिजे; पण ज्ञानाखेरीज भक्ती पूर्ण होत नाही. ज्ञान आणि भक्ती एकत्रच असले पाहिजेत.
प्रश्न : गुरुजी, अंडे शाकाहारी की मांसाहारी?
श्री श्री रविशंकर : सत्संगमध्ये बसून अंड्याविषयी चर्चा, मला हे योग्य वाटत नाही. अंड्याचे जाऊ दे. आपण ब्रह्मांडाविषयी बोलू. इथे आपण चर्चा करतो शरीराची आणि ब्रह्मांडाची, अंड्याची नव्हे. अंड्याचे फायदे आणि तोटे समजून घेण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करू शकता.
कालच मी एका डॉक्टरकडून ऐकले, त्याने बरेच संशोधन केले आहे की, प्रत्येकाने दररोज १० मिनिटे सूर्याकडे टक लावून पाहिले पाहिजे. असं म्हणतात की, प्रत्येकाच्या डोळ्यात काही विशिष्ट पेशी असतात ज्या आपल्या शरीरात सूर्याच्या उर्जेपासून रक्त तयार करतात. काहीसे प्रकाशसंश्लेषणासारखे. वनस्पती सूर्याच्या किरणांपासून हरितद्रव्य तयार करतात. सूर्यकिरणांतील तोच घटक आपल्या डोळ्यातील रक्तपेशी शोषून घेतात आणि त्याचे रूपांतर रक्तात करतात. ते एक उत्तम सादरीकरण होते. म्हणून रक्त शुद्ध करण्यासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी सूर्याकडे टक लावून पाहिले पाहिजे. आपल्या वाडवडिलांनीदेखील हेच तर सांगितले आहे.
संध्यावंदन म्हणजे काय आहे? हातात पाणी घेऊन, उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे रहावे. हातातील पाणी पूर्णपणे ओघळून जाईपर्यंत सूर्याकडे टक लावून पहात रहावे. असे ३ वेळा करावे. याला साधारणत: १० मिनिटे लागतात. यानंतर सूर्याकडे पाहातच गायत्री मंत्राचा जप करावा. संध्याकाळीदेखील असेच करावे.
जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेव्हा आपल्या शरीरात उर्जेचा संचार होतो.
असे म्हटले जाते की, आपण आहारात कच्चे धान्य, कच्च्या पालेभाज्या, फळे आणि रस असे अन्न घेतले पाहिजे. आपल्या आहारतील ८०% अन्न हे कच्चे तर २०% अन्न हे शिजवलेले असले पाहिजे. ब्रेन ट्युमर, कॅन्सर हेदेखील फक्त तीन आठवडे कच्चे अन्न घेणे आणि सूर्याकडे टक लावून पाहणे याने बरा झाल्याची उदाहरणे दिली जातात. अर्थातच सुदर्शनक्रियेनेदेखील ते बरे होतात.
तसेच आपण आपल्या शरीरावर अनेक क्रीम्स् लावतो, ती क्रीम्स् आपण जर खाल्ली तर आपण मरून जाऊ. कारण त्यामध्ये हानिकारक रसायने वापरलेली असतात. आपण जेव्हा ही क्रीम्स् आपल्या शरीरावर चोळतो, तेव्हा आपले शरीर क्रीम शोषून घेते आणि ते थेट आपल्या रक्तात मिसळले जाते. म्हणूनच आपण आपल्या शरीरावर असे कुठलेही पदार्थ लावू नयेत जे आपण खाऊ शकत नाही. म्हणूनच आयुर्वेदिक क्रीम्स् शिवाय इतर क्रीम्स वापरणे चांगले नाही. उंदीर मारण्यासाठीच्या विषात जे घटक पदार्थ वापरले जातात, तेदेखील काही क्रीम्समध्ये वापरले जातात. म्हणून असे एखादे क्रीम जर आपण खाल्ले तर आपला मृत्यू होऊ शकतो; तसेच हे क्रीम आपण शरीरावर लावतो तेव्हा आपला हळूहळू मृत्यू होतो.
पूर्वीच्या काळी त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी चिखल, दुधावरची साय, डाळीचे पीठ आणि हळद याचा वापर केला जात असे. तसाच आपणही तो आता केला पाहिजे.
मी याकडे स्वत: लक्ष देईन. आपण असे डाळीच्या पीठापासून अजून काही पदार्थ तयार केले पाहिजेत जे खातापण येतील आणि अंगालाही लावता येतील. मी आपल्या डॉक्टरांना सांगून असे क्रीम तयार करुन घेईन ज्याच्यात कोणताही विषारी पदार्थ नसेल.
प्रश्न : विवेक जागृत झाल्याने माणूस संवेदनशील बनत नाही का? आणि तसे असेल तर अनेक विद्वान लोक अनिष्ट मार्गाने कसे जातात?
श्री श्री रविशंकर : या जगात सर्व प्रकारचे लोक असतात. काही लोक चांगले असतात, काही सामान्य असतात, तर काही लोक ढिम्म असतात. आणि आपणाला या सर्वांबरोबर जमवून घ्यावे लागते. ढिम्म लोक तुम्हाला मिळणारी संधी जास्त बळकट करतात. सामान्य लोक तुमच्यातील कौशल्याला वाव मिळवून देतात तर चांगले लोक तुम्हाला आधार देतात. म्हणून तुम्हाला या तीनही प्रकारच्या लोकांशी जुळवून घेतले पाहिजे.

प्रश्न : गुरुजी, मला मुक्तीबद्दल फार काही माहीत नाही, मग मला मुक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा कशी होणार?
श्री श्री रविशंकर : जेव्हा तुम्ही बंधनात आहात असे तुम्हाला वाटते तेव्हाच मुक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा होते. जेव्हा तुम्ही आनंदी असता आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची बंधने नसतात तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा होणार नाही.
ज्याला आनंदी राहण्याची इच्छा नसते त्याला मुक्ती मिळते, आणि ज्याला मुक्ती मिळवण्याची इच्छादेखील नसते त्याला प्रेम मिळते. जे प्रेम करतात ते मुक्ती मिळवण्याची काळजी करत नाहीत. प्रेम करणारा असाच विचार करतो की कसली मुक्ती? मला त्याची काही गरज नाही. गोपी म्हणत, आम्हाला काही मुक्ती नको; आम्हाला कसले ज्ञान नको; आम्हाला फक्त प्रेमात राहू दे, आम्ही आनंदी आहोत.
प्रश्न : गुरुजी, धर्म आणि देव यांचा संबंध काय?
श्री श्री रविशंकर : मला एक सांगा, देवाचा संबंध कशाशी नाही? देवाचा संबंध धर्माशी पण तसाच अधर्माशीदेखील आहे. अधर्म नष्ट करून धर्मची उन्नत्ती करणे ही देवाची जबाबदारी आहे. म्हणून देवाचा संबंध सगळ्याशी आहे.
तशाच प्रकारे, पूजा-विधीमध्ये म्हटले आहे, धर्माय नमः अधर्माय नमः. आपण दोहोसही नमः म्हणतो. या जगात धर्म आणि अधर्म दोन्ही आहे आणि देवाचा संबंध या दोन्हीशी आहे अधर्माचा नायनाट करून धर्म प्रस्थापित करण्यासाठी.
प्रश्न : गुरुजी, शिवतत्त्व म्हणजे काय?
श्री श्री रविशंकर : तुम्ही जेव्हा म्हणता की, हे नाही, हे नाही, हे नाही, आणि सर्व काही काढून टाकता, तेव्हा जे राहते ते म्हणजे शिवतत्त्व
प्रश्न : गुरुजी, मी ऑनलाईन (इंटरनेटवरून केला जाणारा) व्यवसायात खूप पैसे गुंतवले आणि ते सर्वच्या सर्व गमावले. तेव्हापासून माझे सत्संगमधील स्वारस्य कमीच झाले आहे. मी काय करावे?
श्री श्री रविशंकर : हे पहा, एक ना एक दिवस प्रत्येक गोष्ट ही जाणारच आहे. बरोबर? तुला पण जायचे आहे आणि मलापण जायचे आहे. सामान्यतः आपण प्रथम जातो आणि नंतर आपला व्यवसाय. इथे तुझा व्यवसाय प्रथम गेला आणि त्यानंतर तू जाणार. म्हणून जे गेले ते विसरून जा आणि पुढे चालत रहा.
जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तू काही तुझ्या व्यवसायासह आला नव्हतास. जेव्हा तू लहान बाळ होतास तेव्हा तुझी कोणीतरी काळजी घेतली, बरोबर? कोणीतरी तुला अन्न भरवले, तुझा हात धरून तुला चालवले, तुला झोपवलेसुध्दा. तशाच पद्धतीने कोणी ना कोणीतरी तुझी काळजी घेईलच. जीवनचक्र चालूच राहते.
होय, तुला वाईट वाटणारच. तू तुझ्या आयुष्यभराची कमाई कोठेतरी लावलीस आणि तू अपयशी झालास. तू व्यथित होणे स्वाभाविकच आहे; पण आता तू तुझ्या सर्व व्यथा सोडून देण्यासाठी अगदी योग्य ठिकाणी आला आहेस.
प्रश्न : गुरुजी, लोभीपणाचा अंत कोठे होतो?
श्री श्री रविशंकर : दफनभूमी, तिथे तुम्ही लोभी असू शकत नाही.
हे फार दुर्दैवी आहे की लोभीपणाने आपल्या समाजास, खरे तर सर्व जगालाच ग्रासले आहे. भ्रष्टाचार फक्त भारतातच आहे असे समजू नका. मी जिथे जिथे गेलो तिथे हेच आहे. बल्गेरियामध्ये भ्रष्टाचार आहे, रशियामध्ये भ्रष्टाचार आहे, युक्रेनमध्ये भ्रष्टाचार आहे. प्रत्येक देश भ्रष्टाचाराने ग्रासला आहे. ग्रीसमध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. तो देश भ्रष्टाचारामुळे बुडाला आहे. खूप देशांत भ्रष्टाचार ही समस्या बनली.
प्रश्न : गुरुजी, अनाहत नाद म्हणजे काय? तो निर्माण कसा करायचा? आणि त्याचे फायदे काय?
श्री श्री रविशंकर : अनाहत नादचा खरा अर्थ म्हणजे, जो दोन वस्तूंपासून निर्माण करता येत नाही तर जो आपोआप निर्माण होतो. गंभीर ध्यानधारणा करा, फक्त ध्यानस्थ असताना तुम्ही तो ऐकू शकता. प्रत्येकासच तो ऐकू येईल असेही नाही. कोणी अनाहत नाद ऐकू शकेल, कोणी प्रकाश अनुभवेल, कोणी अस्तित्व अनुभवू शकेल अनुभूती येण्याचे असे अनेक प्रकार आहेत.
प्रश्न : गुरुजी, हिंदू पुराणात म्हटले आहे की, पृथ्वी एका नागाच्या फण्याच्या आधारावर आहे. आणि जेव्हा तो नाग चिडतो तेव्हा संपूर्ण पृथ्वी हादरते. यामागे काय रहस्य आहे?
श्री श्री रविशंकर : सांसारिक शक्ती दोन प्रकारच्या असतात. एक असते अभिकेंद्री बल (Centripetal force) आणि दुसरी अपकेंद्री बल (Centrifugal force). या शक्तींची हालचाल ही सरळ रेषेत नसून ती सर्पाप्रमाणे असते. ही वस्तुस्थिती आपल्या पूर्वजांना माहीत होती. पृथ्वी नागाच्या फण्याच्या आधारावर नाही, पण नाग म्हणजे अभिकेंद्री आणि अपकेंद्री शक्ती, ही वस्तुस्थिती अशाप्रकारे समजावली आहे.
उदाहरणार्थ, भगवान शंकर गळ्याभोवती नाग गुंडाळून बसले आहेत यातून काय सूचित केले आहे, तर ध्यानस्थ अवस्था. जिथे डोळे मिटलेले असल्यामुळे ही व्यक्ती झोपली आहे असे वाटते; पण ते झोपलेले नाहीत, ते जागृत आहेत, हे समजावण्यासाठी भगवान शंकरांच्या मानेभोवती नाग दर्शविण्यात आला आहे. अन्यथा भगवान शंकर आपल्या मानेभोवती नाग कशाला गुंडाळून घेतील? ते संपूर्ण जगाचे स्वामी आहेत, त्यांना धारण करण्यासाठी अन्य काही मिळाले नसते का? जगाच्या स्वामीला कोणत्याही प्रकारचे कंठहार परिधान करता आले असते, त्याने गळ्यात नागच का गुंडाळला आहे? नाही, आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितले आहे त्यामागे अतिशय गहन रहस्ये दडलेली आहेत.
तशाचप्रकारे, शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी. नाग हे अभिकेंद्री बलाचे प्रतिक आहे. साप कधीही सरळ रेषेत चालत नाही. साप जेव्हा पुढे पुढे सरपटत जातो तेव्हा तो वक्र आकार बनवत जातो याला अभिकेंद्री बल म्हणतात. अभिकेंद्री बल म्हणजे जे सरळ रेषेत जात नाही. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते तशीच सूर्याभोवती फिरते. म्हणजे तिथे २ प्रकारच्या शक्ती आहेत - अभिकेंद्री बल आणि अपकेंद्री बल. हेच आपल्या पूर्वजांनी नागाची उपमा देऊन सांगितले आहे.
आणि हा नाग कशावर उभा आहे? तो उभा आहे कासवावर. कासव हे स्थैर्याचे प्रतिक आहे. खरोखर फार मजेशीर आहे हे सगळे.
असेही म्हटले जाते की, जर गुरु (the planet Jupiter) हा ग्रह नसता, तर पृथ्वी टिकून राहू शकली नसती. गुरु हा ग्रह काय करतो, अवकाशातून येणारे सर्व उल्कापाषाण गुरु हा ग्रह स्वतःकडे खेचून घेतो आणि पृथ्वीचे रक्षण करतो. अवकाशातून उल्कापाषाण आणि इतर सूक्ष्म खगोलीय वस्तूंचा पृथ्वीवर वर्षाव चालूच असतो. गुरु हा ग्रह ते सर्व स्वतःकडे खेचून घेतो आणि पृथ्वीला वाचवतो.
नासाने याचे फार सुंदर स्पष्टीकरण दिले आहे.
गुरु हा संपूर्ण विश्वाचा पालक आहे असे आपण म्हणतो. म्हणून या ग्रहालादेखील गुरु असे नाव दिले आहे; कारण तो पृथ्वीचे रक्षण करतो.


ज्ञानामुळे दु:स्वप्न गोड स्वप्नात बदलू शकते


17
2012............................... Sofia, Balgeria
May

सोफिया, बल्गेरिया – १७ मे, २०१२
प्रश्न : आपले वास्तव आपण निर्माण करतो की ते आधीच ठरलेले असते ?
श्री श्री रविशंकर : तुमच्या घरी कुत्रा आहे कां ?
( उत्तर : होय )
बघा, जेव्हा तुम्ही बागेत जाता, तुम्ही कुत्र्याला साखळी बांधून नेता. तसा कायदा आहे. आता त्या कुत्र्याला तितकेच स्वातंत्र्य आहे जितकी त्याच्या साखळीची लांबी आहे. बरोबर ? जिथे साखळी सुरु होते तिथे तो बसू शकतो किंवा जितकी साखळी लांब आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. त्याला तेवढेच स्वातंत्र्य आहे. तुम्ही जर कुत्र्याला ठराविक जागेत रहाण्याचे शिकवले असेल तर तेच त्याचे स्वातंत्र्य. तो वीस किलोमीटर लांब जात नाही.
तसेच जीवनात प्रत्येकाला काही स्वातंत्र्य असते आणि काही गोष्टी ठरलेल्या असतात.
माणसाला स्वातंत्र्य असते कारण त्याला बुद्धी असते. जनावरांचे जीवन ठरलेले असते. ते कधीही जास्त खात नाहीत. त्यांचे जीवन निसर्गाशी मिळते जुळते असते. आपल्याला निसर्गाशी मिळतेजुळते घेण्याचे किंवा निसर्ग नियम मोडण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्हाला कळतंय कां मी काय म्हणतोय ? तुम्ही जेव्हा निसर्गाशी मिळते जुळते घेता तेव्हा सुमेळ साधला जातो आणि जेव्हा तुम्ही निसर्ग नियमांच्या विरोधात जातो तेव्हा लय बिघडते. तेव्हा जीवनात बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात आणि काही गोष्टींचेच स्वातंत्र्य असते.  
मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. जेव्हा पाउस पडत असे तेव्हा भिजायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही छत्री किंवा रेनकोट घेऊन जाउन कोरडे राहू शकता.
आयुष्य म्हणजे स्वातंत्र्य आणि नियती यांचा मिलाफ आहे. तुम्ही ध्यानात जेवढे खोलवर जाल तेवढे तुम्ही जास्त आनंदी होता, तुम्ही जेवढे आनंदी व्हाल तेवढेच तुम्ही निसर्गाशी जुळले जाता आणि तुमचे स्वातंत्र्य जास्त वाढते.

प्रश्न : जेव्हा जीवनाचा अंत होतो तेव्हा जगाचा अंत होत नाही. पण जेव्हा जगाचा अंत होतो तेव्हा जीवनाचाच अंत होतो. या जगाचा अंत होणार आहे कां ?
श्री श्री रवीशंकर : तुम्ही जर टेनिसचा बॉल बघून मला विचारलेत की बॉलची सुरवात कुठे आणि शेवट कुठे तर मी काय सांगणार ?
जगातील तीन गोष्टींना आदि ( सुरवात ) नाही आणि अंत नाही.
१.       दिव्य प्रकाश किंवा चैतन्याला आदि अंत नाही.
२.       जीवनाला आदि अंत नाही ते अनंत आहे.
३.       पृथ्वीला, आपल्या जगाला आदि नाही अंत नाही. त्याचे रूप बदलेले पण ते चालू राहील. काळजी करू नका. जगाचा अंत होणार नाहिये. विशेषत: २०१२ मध्ये . जगाचा अंत फक्त अमेरिकेतल्या सिनेमात होतो.

प्रश्न: मला स्वप्न पडले होते की मी ह्या कोर्सला येतोय आणि तुम्हीही माझ्या स्वप्नात आला होतात.स्वप्नात पुढे काय होणार त्याबद्दलचे अंतरज्ञान असते कां ?  
श्री श्री रविशंकर : सहा प्रकारची स्वप्ने असतात. तुम्हाला ऐकायचे आहे कां ?
पहिला प्रकार म्हणजे दिवा स्वप्ने. ते आपण बाजूला ठेऊया. ते स्वप्न म्हणण्यासारखे नसते. दुसऱ्या प्रकारचे स्वप्न असते ते भूतकाळातल्या अनुभवांबद्दल असते. तुम्ही पूर्वी अनुभवलेल्या गोष्टी आणि संस्कार यांची स्वप्ने पडतात.
तिसऱ्या प्रकारची स्वप्ने म्हणजे तुमच्या इच्छा आणि भीती, त्यांची स्वप्ने पडतात.
चौथ्या प्रकारची स्वप्ने म्हणजे तुमचे अंतरज्ञान किंवा अपशकून. पुढे काय होणार त्याचे स्वप्न तुम्हाला पडते. 
चौथ्या प्रकारच्या स्वप्नांचा तुमच्याशी काही संबंध नसतो पण तुम्ही ज्या जागेवर झोपता त्याच्याशी असतो. तुम्हाला काही अनोळखी चेहरे दिसतात, अनोळखी भाषा ऐकू येतात.
सहावा प्रकार म्हणजे या सर्वांचे मिश्रण. आणि ९९ टक्के स्वप्ने या प्रकारची असतात. त्यामुळे या स्वप्नांचा अर्थ न लावणे किंवा त्याची फारशी काळजी न करणे हे सर्वात चांगले. 
सांगता येत नाही ,काही स्वप्ने पुढे घडणाऱ्या चांगल्या किंवा गोष्टींबद्दल असू शकतील. आणि त्यातली  काही फक्त तुमची भीती किंवा काळजी यांची असू शकतात. त्यामुळे, जाऊन एक कपभर चहा घ्या आणि खुश रहा हे सर्वात चांगले. स्वप्नातून जागे व्हा.
सूज्ञ लोक आयुष्यसुद्धा स्वप्नच मानतात. तुमचा सगळा भूतकाळ म्हणजे एक स्वप्न समजा. ते होऊन गेले आहे, हो की नाही ? ते स्वप्नवतच आहे.   
स्वप्न म्हणजे दुसरे काही नाही तर संस्कारांच्या आठवणी असतात. ते सगळे मागे पडले आहे. आणि हे  आताचेही स्वप्नच होणार आहे. तेही मागे पडणार आहे. आणि उद्या,परवा,तीन दिवसांनंतर तुम्ही घरी परत  गेल्यावर म्हणाल, “आम्ही बल्गेरियाला गेलो होतो. हे स्वप्नवतच वाटते आहे.”
तसेच, तुम्ही जर विचार केलात तर दिवसानंतर दिवस असे करत करत आणखी पन्नास वर्षे या पृथ्वीवर जगाल आणि मग तुम्ही जागे व्हाल आणि म्हणाल, “ हे स्वप्नासारखे वाटते आहे. सगळे मागे पडले.”
आणि ज्ञानाने प्रत्येक दु:स्वप्न गोड स्वप्नात बदलू शकते.

प्रश्न : आत्मा आपल्याच कुटुंबात पुनर्जन्म घेऊ शकतो कां ?
श्री श्री रविशंकर : जर ती व्यक्ती आपल्या नातवंडांमध्ये खूप जास्त गुंतलेले असली, तर हे शक्य आहे. जर मनात फक्त एकच विचार असेल की, “ माझी नातवंडे, माझी नातवंडे”, तर त्यांचा जन्म तिथेच होईल. 
आपल्यात खोलवर रुजलेला जो ठसा असेल त्यावर पुढचा जन्म ठरतो.

प्रश्न : कर्म केवळ व्यक्तिगत असते की देशाचेही असते ?
श्री श्री रविशंकर : कर्माचे अनेक सत्र असतात. वैयक्तिक कर्म असते, कौटुंबिक कर्म, सामाजिक कर्म देशाचे असते आणि काळाचेही कर्म असते. कर्माचे अनेक स्तर असतात.पण सर्व बदलू शकते.
जेव्हा तुम्ही बसून ध्यान करता तेव्हा परिस्थितीमध्ये निरनिराळ्या प्रकाराने परिवर्तन घडू शकते. असे समजू नका की तुम्ही फक्त तुमच्यासाठीच ध्यान करत आहात. जेव्हा तुम्ही क्रिया किंवा ध्यान करता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे कर्म सकारात्मक करता असे नाही तर तुम्ही या ग्रहांवर आणि इतर सूक्ष्म ग्रहांवरही परिणाम करत आहात. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा त्याने मनाला छान वाटणारा आणि शांत करणारा परिणाम होतो. फक्त तुमच्यावरच नव्हे तर देहावसान होऊन निघून गेलेल्यांवारही होतो.

प्रश्न : आम्ही आमचे जीवनकार्य कसे शोधायचे ?
श्री श्री रविशंकर : कामगिरी लक्षात येण्यासाठी आधी तुमचे मन शुद्ध व्हायला हवे. आणि ‘ पोकळ आणि रिक्त’ ( हॉलो अॅँड एम्टी ) ध्यान करण्याने मन खूपच शुद्ध होते. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा अंतर ज्ञान स्फुरू लागते.
याचा विचार करा की लोकाना मी कसा उपयोगी पडू शकेन, आणि जेव्हा तुम्ही भोवतालच्या लोकाना उपयोगी पडू लागता, तुमचे जीवन सेवा करण्यासाठी असते तेव्हा तुम्हाला जीवन खूपच अर्थपूर्ण आणि समाधानकारक वाटू लागते. जर तुमचे जीवन तुमच्या भोवतीच केंद्रित झालेले असेल की “ माझे काय, मला काय मिळेल ? मी जास्त आनंदी कसा होईन ?” तर मग तुम्हाला नैराश्य येते.
हे बघा, तुमच्यातील सामर्थ्य आणि गुण दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरण्याकरता असतात. जर निसर्गाने तुम्हाला चांगला आवाज दिला असेल तर तो तुमच्यासाठी असतो की दुसऱ्यांसाठी ? तुम्ही स्वत:च गाऊन, स्वत:च स्वत:चे गाणे ऐकता कां ? जर निसर्गाने तुम्हाला आवाज दिला असेल तर तो दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. जर निसर्गाने तुम्हाला चांगली शरीरयष्टी दिली असेल तर ती तुमच्यासाठी की इतरांसाठी. दुसऱ्यांनी तुमच्याकडे पाहून आनंद लुटण्यासाठी.
तर, तुमच्याकडे कोणतेही सामर्थ्य असेल तर ते तुमच्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे.
तुमच्याकडे असलेले कोणतेही सामर्थ्य किंवा बळ दोन प्रकारे वापरता येते. तुम्ही ते सामर्थ्य दुसर्याशी मारामारी करण्यासाठी वापरू शकता किंवा दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी वापरू शकता. शेकडो वर्षांपासून जगातील लोक दुसऱ्यांशी लढण्यासाठी सामर्थ्य मिळवतात. हो की नाही ? दुसऱ्यांशी लढण्यासाठी सामर्थ्य मिळवतात आणि मग कोणाशी लढतात तर बरोबरीचे सामर्थ्य असलेल्यांशी.
आपल्यापेक्षा  कमी सामर्थ्यवान असलेल्यांशी नक्कीच कोणी लढत नाही. आपल्या बरोबरीचे असलेल्यांशीच कोणीही लढाई करते, आणि सामर्थ्य आहे म्हणून लढण्याने कोणालाही आनंद मिळत नाही. तुम्हाला दिले गेलेले सामर्थ्य चांगल्या कामासाठी, सेवा करण्यासाठी वापरले गेले तर तुम्हाला समाधान आणि आनंद मिळतो.
तर, तुमच्याकडे जे काही असेल, सामर्थ्य, सौंदर्य, पैसा, व्यक्तिमत्व, आवाज हे सर्व काही सत्कर्मासाठी, दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापराचे आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यात किती समाधान वाटते.  

प्रश्न : (मंदबुद्धी मुलांना कशी मदत करावी यावरचा प्रश्न)
श्री श्री रविशंकर : जा आणि काही वेळ त्यांच्याशी खेळा.एवढे पुरेसे आहे. असे समजू नका की त्यांना वाईट वाटते आहे किंवा ते दु:खी आहेत. ते दुसऱ्याच परिमितीत जगत असतात.ते इथे तुमच्याकडून सेवा करून घ्यायला आले आहेत इतकेच.

प्रश्न : कुणी आपली मदत नाकारली असेल त्याना आपण मदत करण्याचा आपला अधिकार आहे कां ? त्यांची इच्छा पवित्र आहे हे लक्षात घेतले तर आपण त्याना मदत करावी  कां ?
श्री श्री रविशंकर : मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा एखादा लहान मुलगा भिंतीवरून धावत चालला आहे आणि तो पडण्याची भीती आहे तर तुम्ही काय कराल ? त्या मुलाला त्याचे स्वातंत्र्य उपभोगू द्यायचे ? नाही तुम्ही त्या मुलाला समजावून परत आणाल, बरोबर ?
तसेच जर कुणी मादक पदार्थांच्या व्यसनात अडकला असेल आणि त्यांच्यासाठी ते धोकादायक आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही जाऊन त्यांना मदत करणार नाही कां ? तर आपण आपले सर्व कष्ट पणाला लावून लोकांना त्रासातून बाहेर यायला मदत केली पाहिजे.
जर कुणी मानसिकदृष्ट्या आजारी असेल आणि औषध घेत नसेल तर घरचे काय करतात ? त्याचे तसे चालू देतात ? तो हिंसक होऊन सर्वांना मारू लागेल. कुटुंबातले सूज्ञ सभासद त्याला सांगितलेले औषध फळाच्या रसातून किंवा दुधातून त्याला देतात आणि त्याने त्याला बरे वाटते.
तर, नेमके असे काही नसते. त्या त्या परिस्थितीत तुम्ही तुमचा सुज्ञपणा वापरायला हवा. तुम्ही मदत करायची जबरदस्ती कुणावर करू शकत नाही. समजा कुणाला रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी न्यायची  असेल तर ते असे म्हणू शकत नाहीत की रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवायला मी स्वतंत्र आहे. तुम्ही समाजात रहात असताना तुम्हाला काही नियम पाळावेच लागतात.

तसेच जेव्हा तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तेव्हा तुम्हालाही काही नियम पाळावे लागतात.कुणावरही जबरदस्ती करू नका पण त्या बरोबरच कुणाच्या घराला लागलेली आग विझवण्यासाठी ते तुम्हाला आमंत्रण देतील याची वाट बघू नका. जर तुमच्या शेजाऱ्यांच्या घराला आग लागली असेल तर तुम्ही फोन येण्याची किंवा आग विझवण्याच्या आमंत्रणाची वाट न बघता आग विझवायला धाऊन जाता. तुम्ही ते करता की नाही ? तर ध्यानात घ्या , मध्यम मार्ग धरा.

प्रश्न : ( ऐकू आला नाही )
श्री श्री रविशंकर :  त्यांना मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते आपण करू. मी तुमच्या सोबत आहे. आपण सर्वांनी एक गट बनवूया. त्यांना नवचेतना शिबीर करवूया. आणि मद्यपान व्यसनातून त्यांना बाहेर काढू. जिप्सी अल्पसंख्यांकांची हीच समस्या आहे की ते मद्यपान करतात, मद्यपान करतात आणि मद्यपान करतात. त्यांच्या कमाई पैकी पन्नास ते साठ टक्के पैसे ते दारूत खर्च करतात आणि त्यांच्या बायकानाही मारतात. त्या बायका बिचाऱ्या दु:खात असतात. हे आपण बदलायला हवे. आपण त्यांच्यासाठी विनामुल्य शिबिरे करुया.

प्रश्न : मी विद्यार्थ्यांबरोबर काम करतो. ते कुटुंब कां स्थापन करू शकत नाहीत ? ते एकमेकांना शोधून नाते कां जोडत नाहीत ?
श्री श्री रविशंकर : तुम्ही नातेसंबंध शोधताय कां ? होय ? बरं, आपण इथे एक वधु वर संशोधन केंद्र सुरु करुया. एकटे लोक नोंदणी करू शकतात.   

प्रश्न : मी प्रामाणिकपणे या सर्व साधना करतो पण मी बदललो आहे की नाही याबद्दल मला शंका आहे. मी अजूनही अस्वस्थ होतो आणि त्यामुळे मी दु:खी होतो.
श्री श्री रविशंकर : ऐका, आता तुम्ही कसे आहात ? आत्ता तुम्ही आनंदी आहात कां ? पूर्वीचे जाउदे. आता इथे असण्यात आनंद आहे कां ? तुम्ही मजेत आहात कां ? झाले तर मग.
आपल्या प्रत्येकाच्या आंत दोन गोष्टी असतात. एक गोष्ट आहे जी बदलत नाही. चैतन्याचा एक सतत चालू असणारा प्रवाह असतो तो बदलत नाही. भोवतालच्या अनेक गोष्टी बदलत असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा मागे वळून आयुष्याकडे बघता तेव्हा लक्षात येते की तुम्ही पूर्वी जे होतात ते आता राहिलेले नाहीत. पण त्याचं वेळी, बघायला गेले तर तुम्ही तीच व्यक्ती आहात. दोन्ही एकाच वेळी आहेत.
तुम्ही बदलला नाहीत असे तुम्हाला कधी वाटते ? तुम्ही अस्वस्थ होता तेव्हा. जर कुणी तुम्हाला, मुद्दाम चिथवले आणि तुम्हाला राग आला की तुम्ही म्हणता, “अरे, मी बदललो नाही, मला अजूनही राग येतो.” हीच समस्या आहे. बरोबर? हे खरे नाही. भूतकाळात तुम्ही रागावलात पण तुमच्यात तो राग महिनोन महिने टिकून राहिला. तुम्हाला अजूनही राग येतो, पण तो काही मिनिटेच रहातो किंवा तुम्ही एक छोटी क्रिया करेपर्यंत रहातो आणि पुन्हा ताजेतावाने होता.


भक्ती ही एक भेट आहे


11
2012............................... Montereal, Canada
May

माँन्टरिअल कॅनडा,११ मे २०१२

भक्ती ही एक भेट आहे. तुमच्या स्वतःच्या भक्तीचे श्रेय तुम्ही स्वतःला घेऊ शकत नाही. मी किती भक्तीवान आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचे श्रेय घेऊ शकत नाही. जर तुम्ही इतके भक्तीवान आहात तर ती एक देणगी आहे, एक वरदान आहे.
भक्ती काय करते? भक्ती तुम्हाला अतोनात आनंद देते, सखोल प्रेम देते आणि अनेक सिद्धी प्राप्त करून देते. सिद्धी  म्हणजे तुम्ही जो विचार करता तसे घडते आणि तुम्हाला काय पाहिजे तसे घडते, तुम्ही जर कोणाला आशीर्वाद दिला तर तो सत्य होतो; हे सर्व घडते ते तुमच्या भावाच्या अस्तित्वाद्वारे.  भक्ती म्हणजे आपल्या भावाचे अस्तित्व होय.
योग सूत्रांमध्ये ऋषी पतांजली म्हणतात,संधी सिद्धीरीशवरप्रनिधानात, ईश्वरीय भक्ती ही समाधीत परिपूर्णता आणते. ती आपल्या ध्यानामध्ये इतकी शांतता आणते की तुम्ही अतिशय परिपूर्ण अवस्थेत पोचता.
म्हणून आपण असे कधी म्हणू शकत नाही की ,अरे मी किती भक्तीवान आहे, जर तुम्ही इतके भक्तीवान आहात तर ती एक देणगी आहे. तुम्ही केवळ प्रार्थना करा की ही माझ्या सोबत कायमची असू दे. कोणत्याही कारणाने ही खराब होवो.
भक्ती ही हिऱ्याप्रमाणे आहे;मातीच्या बदल्यात तिचा सौदा करू नका. वाटीभर माती करिता हिऱ्याचा व्यापार होता कामा नये.
तुम्ही तुमची भक्ती कुठे हरवून बसता ते तुम्हाला माहिती आहे? क्षणभंगुर गोष्टी करण्यात, कोणाबरोबर भांडण्यात, कुठल्यातरी गरजेकरिता, उदाहरणार्थ नोकरीची गरज, किंवा तुमचे नातेसंबंध नीट नसले की मग तुमच्या भक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
तुम्ही नोकरी गमावून बसलात आणि भोगावे लागते तुमच्या भक्तीला. जर तुमच्यावर कोणी काही आळ घेतला तर तुमची भक्ती गेली. जर तुमचे काम होत नसेल तर तुमची भक्ती संपली. तर आपण आपली भक्ती हि काही डाँलर करिता अथवा छोट्या छोट्या गोष्टींकरिता गमावून बसतो आहे. हो की नाही?
आता असे बघा की तुम्ही जर औषध व्यावसायिक असाल आणि तुम्ही लोकांना औषध दिले आणि बऱ्याच वेळा ते योग्य लागू पडले पण काही वेळा ते लागू पडत नाही. ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ते कर्मावर अवलंबून आहे.
त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात आणि बऱ्याच घडत नाहीत, पण निदान तुम्ही तुमच्या श्रद्धेला पकडून ठेवा.
मी पुन्हा सांगतो की काही वेळा ती गेलेली किंवा निघून जात आहे असा भास होतो,परंतु तेव्हा देखील तुम्ही काही करू शकत नाही. स्वथ बसा आणि तिच्यासाठी प्रार्थना करा.
तर भक्ती किंवा श्रद्धा ही भेट आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि तसा घेता कामा नये. जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही ध्यानातून घसरू लागता आणि भक्तीच्या बाहेर जाता. असेच होते जेव्हा आपण भक्तीला ओळखतो आणि त्याचा फायदा घेऊ बघतो,आणि ,मी किती भक्तीवान आहे, याची शाहनिशा करून घेतो.
जर तुम्हाला याची जाणीव असेल तर लहान मुलाप्रमाणे असा आणि सोडून द्या. जर तुम्ही भक्त असाल तर भक्त असण्याबद्दल कृतज्ञता ठेवा, हाच सुरक्षित मार्ग आहे. आणि मग भक्ती दर क्षणाला वृद्धिगत होईल.
असे बघा,कृतीमध्ये कधीही परिपूर्णता नसते. कोणत्याही महान कृतीमध्ये तुम्हाला % तरी चूक सापडेलच. निसर्ग तसाच आहे. कोणतीही कृती,कितीही चांगली असो,कितीही फायद्याची असो,त्यामध्ये थोडेफार दोष हे असणारच. समाधी ही भक्तीमुळेच परिपूर्ण होते.
आता जर तुम्हाला वाटले ,अरे मला तर भक्ती वाटत नाही,मी काय करू? काही करू नका,स्वस्थ राहा!असा विचार करू नका की तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे आहे फक्त  ती अजूनपर्यंत आविष्कृत झालेली नाही,पण ती होणार. काही सेवा करा आणि थोड्याफार चांगल्या गोष्टी करण्याने थोडी जमेची बाजू होईल आणि मग ती आविष्कृत होईल. ज्ञानामध्ये राहा आणि ती उघड होईल.
नवशिक्यांच्या भक्तीवर सुरुवातीला फलज्योतिषाचा परिणाम होईल. जेव्हा एखाद्या ग्रहाची युती होईल,त्यावेळेस,सर्वात प्रथम भक्ती हि पार्श्वभूमीवर जाईल. तर मग जेव्हा गुरु ग्रह हा आठव्या घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला अष्टम गुरु संबोधितात.
असे म्हणतात की पंडितांना माहिती असते की माणसाला अष्टम गुरु आहे आणि त्याला त्या वर्षभरात अतिशय अशांततेचा सामना करावा लागत आहे.
आता काय होईल? मन सगळ्या जागी भटकते, मन अशांत रहाते, प्रत्येक निर्णय चुकीचा होतो, तो जे काही करतो ते निराशाजनकच होते, आणि याशिवाय तो त्याचा अध्यात्माचा रस संपूर्णपणे हरवून बसतो. हे प्रत्येक १२ वर्षातून एकदा घडते. हे दोन महिने,सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्ष टिकते.
जर ते दोन किंवा चार ते सहा महिने असेल तर ते अतिशय तीव्र असते. म्हणून जर कोणाला माहिती असेल, अरे हा तर माझा अष्टम गुरु आहे म्हणून माझे मन असे आहे, म्हणजे तुम्ही रोगाचे निदान केले आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचे मन असे का जात आहे.
जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही विचार कराल,अरे मी तर माझे उभे आयुष्य वाया घालवले. मी प्राणायाम का केले, मी या सर्व गोष्टी का केल्या. हे सर्व व्यर्थ आहे, असेच घडते आणि तुम्ही सगळे करणे बंद करून टाकता.एका वर्षानंतर तुमच्या लक्षात येते, अरे देवा,मी केवढी घोडचूक केली, माझे मन कुठे गेले होते. तुम्ही असा विचार करू लागता.
साडेसाती कशाला म्हणतात ते ज्योतिषींना आणि भारतातील लोकांना माहित आहे, शनीच्या साडेसातीचे साडे सात वर्ष.  त्या काळात लोक खरोखरच त्यांचे नातेसंबंध, भौतिक मालमत्ता हरवून बसतात आणि काही लोकांसाठी तर हा अतिशय मुश्कील काळ असतो. जर माणसाचे मन बाहेरच्या दिशेने धावणारे असेल  तर आरोग्य आणि अशा इतर काळज्या उद्भवतात.
पण जर कोणी अध्यात्मिक असेल तर मग त्याच परिस्थितीत ती व्यक्ती अजून चांगली होईल. हे सर्व ती व्यक्ती कशी आहे यावर अवलंबून आहे.
अरे गले सात वर्षे माझे काहीच काम होत नाही. मी प्रयत्न करतो पण सगळेच अयशस्वी होते. हे शनीच्या साडेसातीत घडते जी दर ३० वर्षातून एकदा येते. म्हणजे ती आयुष्यभरात केवळ दोनदाच येते, नेहमी नेहमी येत नाही. पण ती माणसाला हलवून टाकते; अगदी त्याचे तेल निघते.
साधारणपणे जर व्यक्ती १५ ते २० वर्षाचे बालक असताना आली,तर त्याचा इतका परिणाम होत नाही.  व्यक्ती ५० वर्षाची असताना जर आली तरी त्याचा जास्त परिणाम होत नाही.
तर या साडेसात वर्षाच्या कालावधीत उलथापालथ होते. ऐक प्रकारे ती माणसाला अंतराभिमुख करते. जर तुम्ही निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की काही संकटांमुळे तुम्ही या अध्यात्मिक मार्गावर आलात. तुमच्यापैकी कितीजण संकटकाळामुळे आलात? शनिदेव हेच तर करतो. तो अशी परिस्थिती निर्माण करतो की तुम्हाला बाह्य जगाचा कंटाळा येतो आणि तुम्ही आतल्या दिशेने वळता. त्यादृष्टीने हे फार चांगले आहे.
पण अष्टम गुरु जो दर १२ वर्षांनी येतो तो भक्तीला हलवून जातो. देव आहे का नाही असे तुम्ही नवलदेखील करू लागता. काहीही उपयुक्त भासत नाही. सगळे दिशाहीन आणि बेचव भासू लागते आणि कंटाळा गोंधळाच्या भावना निर्माण होतात. पण हे थोड्या अवधीकरिताच होते.
आणि ज्या क्षणी तुम्ही सत्संगामध्ये येता, त्याक्षणी तुमचे मन उत्थित होते. हे सगळे साफ होते. म्हणूनच गुरूच्या उपस्थितीत किंवा सत्संगामध्ये किंवा साधना करताना, हे ग्रहांचे परिणाम किमान असतात. त्यांचा तुमच्यावर तेवढा परिणाम होत नाही. लोकांना याचा पुनःपुन्हा, कितीतरी वेळा अनुभव आलेला आहे.
म्हणून या परंपरा अशा आहेत. त्यांची सांगड कशी घातली हे फार विस्मयकारक आहे आणि परंपरेने ज्ञान कसे टिकवून ठेवले हे आश्चर्यकारक आहे.
प्रश्न : गुरुजी, काहीतरी वाटते ती भावना आहे की अंतःस्पुर्ती ते कसे ओळखावयाचे, हे कृपा करून सांगाल?
श्री श्री रविशंकर : काळ तुम्हाला सांगेल.
प्रश्न : जर सृष्टीकर्ता खरा आहे तर मग त्याचाच भाग असलेले हे जग माया कसे काय आहे?
श्री श्री रविशंकर : माया म्हणजे काय? माया म्हणजे आहे असे वाटणे.  3 D मध्ये सर्व कसे दिसते. 3 Dमध्ये किरण खरे असतात परंतु आकृत्या तात्पुरत्या असतात. त्यांचे अस्तित्व खरे नसते. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते? माया शब्दाचा खरा अर्थ आहे जे बदलत राहते, जे मोजल्या जाऊ शकते.  आणि मोजमाप सारखे नसते. जर एखाद्या वस्तूचे वजन एक किलो असेल तर उत्तर धृवावर त्याचे वजन वेगळेच भरेल आणि जर तुम्ही सिंगापूरला गेलात तर त्याच वस्तूचे वजन अजून वेगळे असेल. जर तुम्ही चंद्रावर गेलात तर त्याचे वजन इथल्या वजनाच्या \ असेल, भूतकाळात लोकांना याचे ज्ञान होते. म्हणूनच ते म्हणाले की या संपूर्ण विश्वाचे मोजमाप करता येईल आणि ते देखील खरे नसेल.
प्रश्न : आईन्स्टाईनचा उर्जा = वस्तुमान * प्रकाशाच्या वेगाचा वर्ग या सापेक्षतेचा खास सिद्धांत प्रकाशाचा वेग बदलत नाही या वस्तुस्थितीवर आधारित आहे. याबाबत तुमचे काही म्हणणे आहे का?
श्री श्री रविशंकर : गुढ द्रव्याच्या आणि गुढ उर्जेच्या शोधानंतर, आता ते म्हणत आहेत की खुपच मोठा फरक पडलेला आहे. प्रकाशाच्या वेगाचे परिमाणदेखील आता सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही. याबाबतीत प्रेम, प्रकाश इत्यादी मोजता येत नाही, ते दिव्यत्वाचा भाग आहे, ते माया नाही. परंतु विज्ञानाने शोधलेले गुढ उर्जा आणि गुढ द्रव्य अतिशय रोचक आहे. ॠगवेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. असे म्हणतात कि विश्वाच्या सुरुवातीला गुढ उर्जा हि तमाच्या आवरणाखाली होती. लोकांना हे समजत नव्हते; त्यांना हे फार विचित्र आणि अर्थहीन वाटायचे. पण नासदीय सुक्त (ज्याला निर्मितेचे सूत्र म्हणून ओळखतात) मध्ये असे म्हटले आहे, 'ना हे होते ना ते होते,केवळ पूर्ण गुढ उर्जा अंधःकाराच्या अच्छादनाखाली होती'. याबाबतचे अद्यावत संशोधन अतिशय उपयुक्त आहे.  खरे तर असे वाटते की ते संस्कृतमधून भाषांतरच केले गेले आहे. तुम्ही ज्याला आकाशगंगा म्हणता ती, तारे आणि ग्रह कसे केवळ वायू आणि पाणी होते याबद्दल त्याच्यात कथन केले आहे. अवकाश तत्त्वातून वायू कसा आला आणि प्रकाश कसा आला. वायुच्या घर्षणाने प्रकाश निर्मिती झाली, प्रकाशातून पाणी निर्माण झाले आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली. ब्रह्मांडाचे ते इतके सुंदर चित्रण आहे.
प्रश्न : सर्वात प्रिय गुरुजी, आम्ही मंत्राचे ध्यान करण्याऐवजी तुमचे केले तर? तुमच्या ऊर्जेमध्ये मिसळून तुम्हीच बनण्याकरिता ध्यानाचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
श्री श्री रविशंकर : केवळ मंत्र घ्या आणि बाकीचे सोडून द्या,अजून काही करू नका.
प्रश्न : माझ्या शाळेत,जवळ जवळ सगळीच मुले अपशब्द वापरतात, असे शब्द वापरण्यापासून मी स्वतःला कसे काय आवरू? आणि त्यांना असे शब्द वापरणे थांबवायला मी कशी काय मदत करू?
श्री श्री रविशंकर : तुमच्यामध्ये ताकद आहे. मी तर म्हणतो की तुम्ही सुपरमॅन आहात. तुम्ही ठाम राहा,'मी कोणतेही अपशब्द वापरणार नाही'.
तुम्हाला माहिती आहे इतक्या वर्षात मी एकही अपशब्द वापरलेला नाही? जर मी हे करू शकतो तर तुम्ही देखील हे करू हे शकता. मी रागावलेलो असतानादेखील असे शब्द माझ्या तोंडून निघत नाही. सर्वात वाईट जर कोणता शब्द माझ्या तोंडून निघाला असेल तर तो आहे, 'खुळा',येवढेच मी म्हणालेलो आहे. त्याच्यापलीकडे काही नाही, शिव्या नाही, एकसुद्धा अपशब्द नाही,कधीच नाही.
प्रश्न : अध्यात्माचा मार्ग इतका अवघड का आहे?
श्री श्री रविशंकर : अवघड? अरे देवा! हा सर्वात सुकर,विनासायास आणि सहज सोपा आहे. बाकीच्या नोकऱ्या खूप कठीण आहेत. मी जगातील सर्वात सोप्या गोष्टींकडे जातो.  हे आरामदायी आहे आणि एकदम सोपे, तुम्ही हसत, नाचत गात मार्गक्रमण करू शकता. जगातील या बाकीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतात त्या अवघड असतात. जेव्हा तुम्हाला तुमची एखादी इच्छा पूर्ण करावयाची असते, ते किती अवघड असते. पण अध्यात्मिक मार्गावर इच्छा त्यागणे किती सोपे असते आणि मग तुम्ही त्याबद्दल विसरून जाता.
प्रश्न : जर कोणी व्यक्ति,जी तुमच्यावर प्रेम करते आणि तुमची काळजी घेते,ती आता ते प्रेम आणि काळजी दाखवत नाही,तर तुम्ही त्या व्यक्तीचे अजून तुमच्यावर प्रेम आहे यावर कसा विश्वास ठेवता आणि त्या व्यक्तीवर कसे काय रागावत नाही?
श्री श्री रविशंकर : त्यांना थोडा अवधी द्या,त्यांना एक मधली सुट्टी द्या आणि त्यांना त्याचे प्रेम पुनः दर्शवण्याकरिता पुनःप्रभारित होऊ द्या. लोकांना थोडेफार पुनःप्रभारित होण्याची गरज असते.
तुम्ही त्यांच्याकडून सगळे प्रेम आणि लक्ष्य आकृष्ट केले आहे आणि त्याला पुनःप्रभारित होण्याकरिता थोडा वेळ देण्याची गरज आहे. असे लक्षात घ्या की ते त्यांची बॅटरी पुनःप्रभारित करीत आहेत.
जर का तुम्ही अशी मागणी केली की त्यांनी त्यांचे प्रेम दाखवावे,तर याने काम होणार नाही. उलट याचा विरुद्ध परिणाम होईल.म्हणून मागण्या करू नका आणि ,'तू माझ्यावर प्रेम का करत नाही?',असे प्रश्न विचारू नका. असे कधीच म्हणू नका.
खर तर तुम्ही याच्या उलट बोलावे,'तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम का करता? मी त्याच्या लायक नाही. तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम का करता? तुम्ही माझ्यावर खुपच प्रेम करता,मी अजून ते घेऊ शकत नाही.' असे सांगून बघा आणि तुम्ही बघाल की सगळे बदलून जाईल. समोरच्या व्यक्तीला तुमच्यावरील आपले प्रेम सिद्ध करणे याचे इतके ओझे वाटते हे तुम्हाला माहिती आहे.
समजा कोणी तुम्हाला तीच गोष्ट म्हणाले,'मला नाही वाटत की तुमचे माझ्यावर प्रेम आहे,असेल तर चला,दाखवा मला'. तर तुम्ही विचार कराल,'अरे देवा,आता मी खरोखर प्रेम करतो ते मी कसे सिद्ध करू'. हे इतके जड ओझे आहे आणि असे ओझे कोणालाही कायम डोक्यावर घेऊन फिरायचे नसते.
दररोज घरी या आणि तुमचे तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे हे रोज सिद्ध करा. नाही! ते गृहीत धारा आणि पुढे चालत राहात्यांचे प्रेम सिद्ध करण्याकरिता कोणालाही जबाबदार धरण्याचा प्रयत्न करू नका.
प्रश्न : जेव्हा बुद्धांना ज्ञानोदय झाला,तेव्हा इतर गुरूंना आलेला अनुभव त्यांना आला असेल परंतु बुद्ध कधीही देवाविषयी काहीही बोलले नाही. या मुळेच काही लोक तर असेदेखील म्हणतात की बुद्ध हे नास्तिक होते. याबाबत तुम्ही काही बोलू शकाल का?
श्री श्री रविशंकर : बुद्धाच्या काळात देवाविषयीच्या अनेक संकल्पना होत्या. बऱ्याच लोकांचे उपनिषद पूर्णपणे वाचून झाले होते.
बुद्धांचे अनुयायी हे  अतिशय बुद्धिमान होते; ते जीझसच्या अनुयायींच्या परस्परविरुद्ध होते. जीझसचे अनुयायी हे सगळे कोळी होते, साधेसुधे होते. पण बुद्धांचे अनुयायी हे पंडित, प्रज्ञावंत आणि बुद्धिमान होते,म्हणून त्यांना देवाबद्दल माहिती होते;त्यांना ब्रह्म विषयी माहिती होते,त्यांना आत्म्य बद्दल माहिती होते,त्यांना सगळे माहिती होते. आणि जेव्हा तुम्ही बोलणे किंवा चर्चा करणे सुरु करता तेव्हा ते त्या पातळीवरच राहते.
पुन्हा इतक्या वैचारिक शाखा होत्या,जर बुद्धांनी एखाद्या शाखेला पाठींबा दिला असता तर बाकीच्या शाखांचे म्हणाले असते,'नाही,तो मार्ग नाही',  आणि मग ते बुद्धांपासून दूर झाले असते. म्हणून बुद्ध एकदम स्पष्ट होते,ते म्हणाले,'मी या वेगवेगळया वैचारिक शाखांवर बोलता कामा नये.सगळे लोक येतील आणि त्यांना आवडेल आणि ते स्वतःच सत्याचा शोध घेतील',कारण ते सगळे मोठमोठ्या विश्वविद्यालयात अभ्यास करण्यात अडकलेले होते. त्या काळी मोठी विश्वविद्यालये होती, हजारो लोक तिथे अभ्यास करायचे, आणि ते वेगवेगळया वैचारिक शाखांचा, धर्मग्रंथ, औषधशास्त्र आणि सर्व काही अभ्यास करायचे. त्या काळी भारत परमसीमेवर होता.
म्हणून बुद्ध म्हणाले, 'मी या विवादात पडणार नाही. मला त्यांना केवळ एक सरल तंत्र द्यावयाचे आहे'. आम्हीदेखील तेच करतो. आम्ही कोणत्याही विचार प्रणाली, धर्म किंवा इतर काही कशाबद्दल बोलत नाही. आम्ही इतकेच म्हणतो ,'केवळ सुदर्शन क्रिया करा', आणि सगळे ती करतात-मुसलमान,ज्यू लोक,ख्रिचन,हिंदू, बौद्ध, सगळे सगळे ती करतात आणि त्यांना रिकामे आणि पोकळ होण्याचा खरा अनुभव येतो.
तर म्हणूनच बुद्ध म्हणाले,'नाही, मी देवाबद्दल बोलणार नाही'. त्यावेळी तसे करणे योग्य होते.
तर जीझस वेगळा होता, त्याच्या काळात तेव्हा तो ज्या गावात शिकवत होता तिथे केवळ एकाच वैचारिक शाखा होती आणि त्या सर्वांचा देवावर विश्वास होता. यहुदी धर्म ही एकच वैचारिक शाखा होती आणि ते सर्व केवळ एकाच पुस्तकावर अवलंबून होते. म्हणून जीझस त्याच क्रमाने देवाबद्दल बोलला आणि त्याचा नकार न करता त्याने त्यांना ज्ञानाची ओळख करून दिली.
तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?
शिवाय त्याचे अनुयायी हे अतिशय साधेसुधे लोक होते. त्यांचा धार्मिक ग्रंथांचा तेवढा गाढा अभ्यासदेखील नव्हता. तर मग असे सोपे होते, देव म्हणजे प्रेम या साध्या संदेशाने ते आकर्षित झाले आणि ते अनुसरू लागले.
भगवान बुद्धांनी तेच केले जे त्यांना करणे भाग होते आणि ते बिलकुल बरोबर आहे. म्हणूनच मग नंतर जेव्हा आदि शंकराचार्य आणि बाकीचे संत आले,तेव्हा त्यांना दिसून आले कि बुद्ध जे म्हणाले आणि उपनिषदात जे आहे त्यात काहीही फरक नाही आहे. म्हणूनच भारत हा कधीही बौद्ध झाला नाही कारण बुद्ध जे म्हणाले ते भारतात आधीच उपलब्ध होते.
बुद्धांनी एका धर्माची सुरुवात स्वतःहून कधीच केली नाही;ते एक हिंदू साधू म्हणूनच जगले. ते हिंदू साधू झाले आणि हिंदू साधू म्हणूनच त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली. परंतु मागाहून बौद्ध एक वेगळा धर्म बनला. ते सनातन हिंदू धर्माचे, प्राचीन जीवन शैलीचे केवळ एक सुधारक होते. धर्माला धर्म देखील म्हणत नव्हते तर केवळ एक जीवन जगण्याची शैली.  बुद्ध हे त्या जीवन जगण्याच्या शैलीचा एक भाग होते,आणि नंतर मग जेव्हा ती शैली भारताबाहेर गेली तेव्हा ती धर्म झाली.
भगवान बुद्धांचा प्रभाव नंतर नंतर येवढा महान होता की लोक उपनिषद आणि सगळ काही विसरून गेले,आणि मग परंपरेतून आदि शंकराचार्य आले आणि त्यांनी योग आणि वेदांत हे पुनर्प्रस्थापित केले. आदि शंकराचार्यांनी केवळ एक गोष्ट बोलले,एक हलकीशी टिचकी आणि हे असेच घडले सगळे.
बुद्ध म्हणाले सगळे काही रिकामे आहे. 'मी गहन ध्यानामध्ये गेलो आणि मी शोध घेतला पण मला कोणताही आत्मा अथवा स्वत्व मिळाले नाही'. हे त्यांचे शेवटचे वाक्य होते.
आदि शंकराचार्यांनी वेगळ्या प्रकारे सांगितले, त्यांनी स्वत्वाला पदार्थ अथवा द्रव्य संबोधिले. तर आदि शंकराचार्यांनी ते उलट फिरविले आणि ते म्हणाले, 'कोण स्वत्वाला शोधू शकत नाही,तेच स्वत्व आहे,आणि स्वत्व म्हणजे परमानंद आहे, ते अवकाश आहे'.
आणि मग त्यांनी हे संपूर्ण ज्ञान, हे तत्वज्ञान पुन्हा आणले. या टोकापर्यंत बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले सर्व समानच आहे-मी शरीर नाही,मी मन नाही,मी हे नाही,मी ते नाही-आणि जेव्हा तुम्ही गाभ्याच्या केंद्रापर्यंत पोहोचता तेव्हा बुद्ध म्हणता,'काहीच नाही आहे', आणि आदि शंकराचार्य म्हणतात,'सकल आहे.हा आत्मा आहे ,ही चेतनाशक्ती आहे आणि चेतनाशक्ती ही एक जागी आहे, आणि सगळीकडे आहे'.
तर थोडक्यात सांगायचे तर जीझसप्रमाणेच आदि शंकराचार्य हे देखील केवळ ३२ वर्षेच जगले आणि त्या ३२ वर्षात ते संपूर्ण भारतभर अनेकदा फिरले
त्या दिवसांमध्ये वाहने नव्हती,भ्रमणध्वनी नव्हते,काहीच नव्हते. तर असे म्हणतात की आदि शंकराचार्य ज्या कोणत्या दिशेने निघत तिथे विजयश्री आणत असत,तिथे जल्लोष होत असे,कारण बुद्धांच्या  ५०० वर्षांनतर, लोक फार निराशावादी झाले होते, असे म्हणतात की लोकांना जीवनात कसलाही रस वाटत नव्हता. ते म्हणत, 'काही झाले तरी जीवन म्हणजे दुःख,जीवन म्हणजे दैन्य,तर मग आपल्याला काही करण्याची जरुरत नाही'.
सैन्य नव्हते, सर्व राजे निरुत्साही होते, जल्लोषाचा पैलू हरवला होता. लोक केवळ अनित्य विषयी-सगळे काही अशाश्वत आहे तर मग केवळ रिकामे आणि पोकळ बना असे- बोलत. परंतु आदि शंकराचार्य म्हणाले, 'ठीक आहे जर अशाश्वत आहे तर,पण काही तरी शाश्वत]देखील आहे, तर मग आपण सगळे जल्लोष करू या, नाचू या, गाऊ या'.
मग त्यांनी भज गोविंदम सुरु केले आणि नंतर संगीत,नाच,संस्कृती आणि या सगळ्या गोष्टींची आदि शंकराचार्यांनी पुन्हा ओळख करून दिली.
प्रश्न : माझी संतापाच्या आणि अज्ञानाच्या भरात मी माझ्या मायाळू आणि प्रेमळ पत्नीचा आणि माझ्या मुलांचा छळ केला. मला आता जाणीव झाली आहे. मी त्यांच्या अंतःकरणांला बरे वाटण्याकरिता काय करू? मला कायम अपराध्यासारखे वाटते.
श्री श्री रविशंकर : जेवढ करता येईल तेवढ करा आणि आराम करा. ठीक.
प्रश्न : बऱ्याच वर्षांपूर्वी माझी मुंज झाली पण त्यावेळी मी त्या समारंभाचे,ते जानवे आणि संध्यावंदन यांचे महत्व समजू शकलो नाही.तुम्ही कृपा करून सांगू शकाल काय? क्रिया करणे पुरेसे नाही का,संध्यावंदनची काय गरज?
श्री श्री रविशंकर : होय,तुमचे क्रिया करणे पुरेसे आहे आणि नंतर जर तुम्हाला दीक्षा मिळत असेल तर गायत्री जप करा.
गायत्री जपा चा अर्थ आहे-माझ्या बुद्धीला देवाकडून स्फूर्ती मिळू दे.
अफाट देवत्वाला जीवनात पूर्णपणे व्यक्त होण्यापासून केवळ आपली बुद्धी आडवी येते.
म्हणून प्रार्थना आहे की,’माझ्या बुद्धीला देवाकडून स्फूर्ती मिळू दे.माझ्या जीवनात आणि माझ्या बुद्धीमध्ये परम उर्जा आविष्कृत होऊ दे.’
आणि मुंजीत नेहमी जानवे घालतात आणि जानव्याचा अर्थ आहे की तुमची ज्ञानाच्या प्रती, तुमच्या पालकांच्याप्रती आणि समाजाच्याप्रती जबाबदारी आहे. तर त्याचा अर्थ आहे तुमची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यांवर घेणे.
तरुण मुलगा अभ्यासाकरिता निघून जाण्याआधी ते त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतात की, ’तुझ्यावर जबाबदारी आहे’. आणि मग मुलगा अभ्यास करून परत येतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मुक्त होता, तेव्हा संन्यासात ते जानवे काढून फेकून देतात. जर तुम्ही एकांतवासी असाल तर तुम्हाला जानवे घालावे लागत नाही. अशा प्रकारची पद्धती खूप काळापासून पाळली जात आहे.
प्रश्न : गुरुजी, शृंखला शास्त्र समांतर विश्वाबद्दल बोलते. यावर तुम्ही काही बोलू शकाल?
श्री श्री रविशंकर : होय,समांतर विश्वाबद्दल बोलले जाते.१४ विश्वे आहेत आणि ती एकमेकांच्या आत अशी समांतर आहेत. आता याक्षणी इथे खूप विश्वे असू शकतात.
पित्र लोक हे भलतीकडे कुठे नसून,इथेच आहे. म्हणूनच आपण थोड्याच गोष्टींचे,तानमात्रां चे विश्लेषण करू शकतो.
आपल्या जाणिवांमध्ये थोड्याफार प्रमाणात सर्व पंचमहाभूते आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळेच आपण हे सर्व बघू आणि अनुभवू शकतो. आपली प्रकाशाची तानमात्रा ही घुबडाच्या तानमात्रेपेक्षा वेगळी असते. म्हणून जेव्हा बाहेर अंधार असतो तेव्हा तुम्ही पाहू शकत नाही परंतु घुबड बघू शकते.
वटवाघूळाची तानमात्रा ही अजून निराळी असते. जिथे तुम्हाला काहीही दिसत नाही तिथे वटवाघूळ बघू शकतात. त्यांच्या चर्मचक्षुची क्षमता वेगळी असते. अंधार असताना तुम्हाला तुमच्याच खोलीत वावर करण्यास विजेरीची गरज भासेल पण एका मांजरीला त्याची जरुरत भासणार नाही,ते स्वतःचा रस्ता बरोबर शोधून घेते.तर,आपल्या पाच संवेदनांचे प्रत्यक्ष ज्ञान हे तानमात्रा ज्याला म्हणतात त्यावर आधारित असते. आपले सूर हे एखाद्या कंपन संख्येवर असतात तर हे एवढे अफाट मोठे विश्व आहे त्याच्या अगणित कंपन संख्या आहेत.
प्रश्न : माझ्या विशिष्ट स्तिथी करिता मी नुकतेच मनोदुर्दशारोधी औषध सुरु केले आहे. मला तुमच्याकडून आशेचा अगर स्फूर्तिदायक संदेश ऐकायला आवडेल. माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि मला वाटते की मी तुमचाच एक भाग आहे पण आता याक्षणी मला हरलेल्याची भावना वाटते,आणि मला काळजी वाटते की मी माझी प्रतिभा परत मिळवू शकणार नाही. मी लढा देत राहतो,पण तुमच्याकडून दोन शब्दांनी फार मदत होईल.
श्री श्री रविशंकर : नाही,लढा देऊ नका. शरीराला औषधांची गरज आहे,त्यांना फक्त घ्या,आराम करा आणि आनंदी राहा.
जर तुम्ही अध्यात्मात पाउल ठेवले असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा-कोणत्याही परिस्थितीत मी आनंदी असू दे मग मी कुठेही असू दे,कसाही असू,मला खुशच राहायचे आहे.मी आनंदी राहणार,मी प्रसन्नचित राहणार, आणि मला जरी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला तरी मी त्याचा सामना हसत करेन-हा एक विचार,हा एक निर्धार तुम्ही केला पाहिजे.